AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bjp Rajyasabha : भाजप राज्यसभेत पूर्ण बहुमतापासून किती लांब? आता राज्यसभेच्या 37 जागांपैकी किती जिंकल्या?

Bjp Rajyasabha : राज्यसभेची सदस्य संख्या 245 आहे. बहुमतासाठी कुठल्याही एकापक्षाला 123 सदस्यांची आवश्यकता आहे. आता हा प्रश्न आहे की, 37 राज्यसभेच्या जागांवरील निवडणुकीनंतर भाजपचा आकडा कितीने वाढला आहे.

Bjp Rajyasabha : भाजप राज्यसभेत पूर्ण बहुमतापासून किती लांब? आता राज्यसभेच्या 37 जागांपैकी किती जिंकल्या?
PM Modi
| Updated on: Mar 17, 2026 | 12:44 PM
Share

10 राज्यातील 37 राज्यसभेच्या जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात 26 उमेदवार बिनविरोध निवडून आले. 11 जागांवर मतदानाच्या माध्यमातून निकाल लागला. भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए आघाडीला 22 जागांवर विजय मिळाला. विरोधी पक्षाला 15 जागा मिळाल्या. राज्यसभेच्या या निवडणुकीमुळे भाजपची वरच्या सभागृहात ताकद खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण अजूनही ते बहुमताच्या आकड्यापासून लांब आहेत. लोकसभेच्या निवडणुका 2024 मध्ये झाल्या. त्यावेळी भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए आघाडीला बहुमत मिळालं. आता राज्यांमध्ये भाजपची ताकद वाढल्यानंतर संसदेच्या वरच्या सभागृहात राज्यसभेतही त्यांची ताकद वाढली आहे. याचाच परिणाम म्हणजे 10 राज्यातील 37 राज्यसभेच्या जागेवर भाजपच नाही, तर एनडीएची सुद्धा ताकद वाढली आहे.

राज्यसभेची सदस्य संख्या 245 आहे. बहुमतासाठी कुठल्याही एकापक्षाला 123 सदस्यांची आवश्यकता आहे. आता हा प्रश्न आहे की, 37 राज्यसभेच्या जागांवरील निवडणुकीनंतर भाजपचा आकडा कितीने वाढला आहे. बहुमतापासून अजून ते किती लांब आहेत?. त्याशिवाय 10 राज्यातील राज्यसभेच्या 37 जागांमुळे सभागृहातील समीकरणावर काय परिणाम होईल?.

या निवडणुकीआधी भाजपचे किती खासदार होते?

10 राज्यातील राज्यसभेच्या ज्या 37 जागांसाठी निवडणुका झाल्या त्या जागा एप्रिलमध्ये रिक्त होणार आहेत. राज्यसभा सदस्यांचा 6 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या एकमहिना आधी निवडणूक आयोग त्या जागांवर निवडणुका घेतो. त्याचाच भाग म्हणून राज्यसभेच्या 37 जागांवर निवडणुका झाल्या. या निवडणुकीआधी भाजपचे राज्यसभेत एकूण 103 खासदार होते. यात पक्षाच्या 9 खासदारांचा कार्यकाळ संपत आहे.

भाजपाने आता किती जागा जिंकल्या?

9 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्यामुळे भाजपची राज्यसभेतील संख्या घटून 94 होत होती. पण भाजप राज्यसभेच्या 37 जागांपैकी 13 जागा जिंकण्यात यशस्वी ठरली. अशा प्रकारे भाजपच्या जागांची संख्या वाढून 107 झाली. म्हणजे आधीपेक्षा चार जागा जास्त वाढल्या. पण अजूनही ते बहुमतापासून दूर आहेत.

भाजपला बहुमतासाठी अजून किती प्रतिक्षा करावी लागेल?

भाजपला स्वबळावर राज्यसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 16 जागांची आवश्यकता आहे. भाजपला 16 राज्यसभेच्या जागा जिंकण्यासाठी जून 2026 किंवा नोव्हेंबर नाही, तर 2028 पर्यंतची प्रतिक्षा करावी लागू शकते. त्यानंतरच राज्यसभेत भाजपची ताकद वाढेल.

Follow Us
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्... 'ऑपरेशन टायगर'बाबत मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...; खासदार फुटीनंतर दादा भुसेंचं मोठं विधान
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा पलटवार; म्हणाले, त्यासाठी ठाकरेंना...
बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
Rohit Pawar On Operation Tiger | बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार, महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Sanjay Raut Full Press | 6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार – आता महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकड
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकडून अधिकृत पत्र जारी, काय घडलं?
खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक!
Yawatmal | खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक! संजय देशमुखांचा पुतळा जाळत संताप!