AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता बॉलिवूडही ‘गॅस’वर! ट्विंकल खन्नाने लढवली अनोखी शक्कल, अक्षय कुमार म्हणाला, माझ्या घरी…

अक्षय कुमारचे घर सध्या तरी एलपीजीवर सुरळीत चालू असले तरी, भविष्यातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर ट्विंकलने ही तयारी केली. अक्षय कुमारने स्वत: याबाबत खुलासा केला आहे.

आता बॉलिवूडही 'गॅस'वर! ट्विंकल खन्नाने लढवली अनोखी शक्कल, अक्षय कुमार म्हणाला, माझ्या घरी...
Twinkle KhannaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 17, 2026 | 12:25 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून इराण विरोधात अमेरिका आणि इस्त्रायल हे दोन्ही देश एकत्र आले आहेत. या दोन्ही देशांनी मिळून इराणवर हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने इंधन तुटवड्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. देशभरात एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्याची चर्चा जोरात आहे. वेस्ट एशिया संकटामुळे पुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण झाली असताना, अनेक घरांमध्ये इंडक्शन शेगडीचा वापर वाढला आहे. तसेच काही ठिकाणी चूली पेटवल्या आहेत. बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि त्याच्या पत्नी ट्विंकल खन्ना यांनाही झळ बसली आहे.

ट्विंकल खन्नाने काय लढवली शक्कल?

अक्षय कुमारने नुकताच याबाबत वक्तव्य केले आहे. त्याने सांगितले की, “एलपीजी तुटवड्याबद्दल फारशी माहिती नव्हती. घरी सध्या तरी सगळं नीट चालू आहे. पण माझ्या पत्नीने दोन इंडक्शन शेगड्या ऑर्डर करून ठेवल्या आहेत.” ट्विंकल खन्नानीही घरातील स्वयंपाक व्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी ही खबरदारी घेतली आहे. गॅस सिलिंडर तुटवड्याची भीती इतकी वाढली आहे की, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी दोन इलेक्ट्रिक शेगड्या (इंडक्शन कुकर) मागवल्या आहेत. एलपीजी खंडित झाला तर पुढे काय? या प्रश्नाने संपूर्ण बॉलिवूडला चिंता वाटू लागली आहे.

सामान्य नागरिकच नव्हे तर बॉलिवूड स्टार्सही सज्ज

सध्या दिल्ली-एनसीआर, मुंबई, तामिळनाडू, गुजरातसह अनेक शहरांमध्ये इंडक्शन शेगडींच्या विक्रीत ३०० टक्के वाढ झाली आहे. रेस्टॉरंट्स, होटेल्स आणि घरगुती स्वयंपाकघरांमध्येही इलेक्ट्रिक अल्टरनेटिव्हकडे वळण्याची धडपड सुरू आहे. अक्षय-ट्विंकल सारखे सेलिब्रिटी देखील या ट्रेंडमध्ये सामील झाले असल्याचे दिसते. अक्षय कुमारचे घर सध्या तरी एलपीजीवर सुरळीत चालू असले तरी, भविष्यातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर ट्विंकलने ही तयारी केली. “एलपीजी खंडित झाला तर पुढे काय?” या भीतीने फक्त सामान्य नागरिकच नव्हे तर बॉलिवूड स्टार्सही सज्ज होत आहेत.

देशात एलपीजीच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्याने सरकारने नागरिकांना सिलिंडर साठवू नका, PNGकडे वळा असे आवाहन केले आहे. तरीही भीती कायम असल्याने इंडक्शन, इलेक्ट्रिक कुकर आणि इतर पर्यायी स्वयंपाक साधनांची मागणी प्रचंड वाढली आहे. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या या निर्णयाने बॉलिवूडमध्येही चर्चा रंगली आहे. सेलिब्रिटी घरांमध्येही ‘एलपीजी संकट’ कसे हाताळायचे याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या तरी अक्षय-ट्विंकल यांचे घर सुरक्षित असले तरी, भविष्यातील तयारी म्हणून दोन इंडक्शन शेगड्या घरात आल्या आहेत. देशातील या संकटातून सर्वांनाच धडा मिळाला आहे.

Follow Us
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची.....
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल.
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर....
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर.....
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या...
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या....
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.