साप आयुष्यात कधीच घरात घुसणार नाही, एका पदार्थाच्या रसामुळे लांबूनच जातो पळून!
दरम्यान, तुमचे घर ग्रामीण भागात असेल किंवा तुमचे घर जंगलात, शेतात असेल तर साप येऊ नये यासाठी एक विशेष काळजी घेता येईल. हा उपाय केला तर तुमच्या घरात साप येणारदेखील नाही. हा उपाय कोणता ते जाणून घेऊ या...

साप म्हटलं की प्रत्येकजण घाबरून जातो. सापाला पाहून अनेकांच्या अंगावर काटा येतो. काही लोक तर साप पाहिला की दूर पळूनच जातात. याच भीतीपोटी अनेक लोक सापाला मारून टाकतात. तसेच साप येऊ नये म्हणून वेगवेगळे उपाय करतात.

दरम्यान, तुमचे घर ग्रामीण भागात असेल किंवा तुमचे घर जंगलात, शेतात असेल तर साप येऊ नये यासाठी एक विशेष काळजी घेता येईल. हा उपाय केला तर तुमच्या घरात साप येणारदेखील नाही. हा उपाय कोणता ते जाणून घेऊ या...

साप येऊ नये म्हणून तुम्ही किचनमधील एका गोष्टीचा वापर करू शकता. विशेष म्हणजे त्यासाठी जास्त पैसेदेखील खरेदी करण्याची गरज नाही. ही गोष्ट म्हणजे लसूण आहे. लसणामुळे साप तुमच्या घरातही येण्याची हिंमत करणार नाही.

लसणाचा वास सापाला अजिबात आवडत नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे लसणाच्या पाकळ्यांचा रस करावा. आणि हा रस अडगळीच्या ठिकाणी, तुमच्या परसबागात ठेवावा. लसणाच्या गंधामुळे साप तुमच्या घरातून पळून जातो. तो घरात येतही नाही, असे मानले जाते.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)