
भारतात सापाची पूजा करतात. तितकेच सापाला घाबरतात. विषारी साप चावल्यास जीव जाऊ शकतो. त्यामुळे अनेकजण साप दिसला की अगोदर लाकूड, काडी शोधतात. त्याला मारण्याचा प्रयत्न करतात.

सापाच्या विषाला सगळेच घाबरतात. पण सापाच्या विषाचा रंग कोणता असतो? तुम्हाला माहिती आहे का? साप चावल्यावर ती जागा काळी-निळी पडते. अनेकांना वाटते सापाचे विष निळ्या रंगाचे आहे. पण तसे अजिबात नाही.

सापाचे विष काचेच्या बरणीत, शीशीमध्ये घेतले जाते, तेव्हा त्याचा रंग कळतो. सापाचा रंग पाहून त्याच्या विषाचा रंग सांगणे अत्यंत कठीण आहे.

सापाच्या विषाचा रंग पिवळा अथवा फिक्कट पिवळा असतो. तर काही सापांच्या विषाचा रंग पांढरा असतो. तर काही सापांचा रंग हलका हिरव्या रंगाचा सुद्धा असतो, अशी माहिती विविध स्त्रोतातून मिळते.

सापाच्या विषात प्रोटीन, पेप्टाइड्स आणि इतर रसायनांचा समावेश असतो. प्रोटीन एंजाईम आणि इतर पदार्थ त्याला विषारी करतात, अशी उपलब्ध स्त्रोतावरून माहिती मिळते.

शास्त्रज्ञांच्या मते, सापाच्या विषाचा रंगावर एल-अमिनो ॲसिड ऑक्सिडेजवर अवलंबून असते. तर गावाकुसाबाहेरील साप आणि जंगलातील सापाच्या विषाचा रंग वेगवेगळा असू शकतो, असे उपलब्ध स्त्रोतावरून लक्षात येते. या माहितीची टीव्ही 9 दावा करत नाही, ही विविध स्त्रोतावरून घेतलेली माहिती आहे.