Tukaram Mundhe: निष्ठा त्याच्या चरणी वाहू नये; तुकाराम मुंढेंबाबत विद्यानंद बापट यांचे खळबळजनक वक्तव्य
Tukaram Mundhe: महाराष्ट्रातील अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे त्यांच्या धडक कारवाईमुळे सध्या चांगलेच आहेत. आता विद्यानंद बापट यांनी त्यांच्या कामाबाबत केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांची बेधडक कारवाई कायम चर्चेत असते. अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. मात्र, पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्ये विद्यानंद बापट यांनी तुकाराम मुंढे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सामाजिक कार्यकर्त्ये विद्यानंद बापट यांनी तुकाराम मुंढे यांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले आहे. टीव्ही ९ मराठी बोलताना विद्यानंद बापट यांनी स्पष्टपणे सांगितले की, कोणत्याही व्यक्तीवर लक्ष केंद्रित करणे योग्य नाही. त्याऐवजी तत्त्वावर आणि विचारांवर भर देणे आवश्यक आहे.
बापट म्हणाले, “फोकस हा व्यक्ती वरती नाही तर तत्त्वावरती असला पाहिजे. विशिष्ट व्यक्ती असा फोकस मला ठेवायचा नाही. एखाद्या व्यक्तीने कितीही योगदान दिलेलं असेल तरी नागरिकांनी आपल्या निष्ठा त्याच्या चरणी वाहू नये"
पुढे ते म्हणाले की, मी व्यक्तीप्रमाण्यावादी नाही तर बुद्धीप्रामाण्यवादी वादी. व्यक्ती वरती फोकस ठेवणं मला योग्य वाटत नाही
त्यांनी पुढे सांगितले की, समाजात आणि सार्वजनिक जीवनात व्यक्तीपूजा टाळली पाहिजे. एखाद्या व्यक्तीचे योगदान कितीही मोठे असले, तरी त्याच्या वैयक्तिक व्यक्तिमत्त्वाभोवती निष्ठा बांधणे धोकादायक ठरू शकते. त्याऐवजी तत्त्वे, विचार आणि बुद्धीनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारणे हेच योग्य मार्ग आहे.