शुभमंगल सावधान! सोहम बांदेकर -पूजा बिरारी अडकले लग्नबंधनात, पाहा Inside Photos
अभिनेते आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांचा विवाहसोहळा लोणावळ्यात थाटामाटात पार पडला. पारंपरिक पद्धतीने झालेल्या या लग्नसोहळ्याला बांदेकर-बिरारी कुटुंबियांसह अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली.
soham bandekar pooja birari marriage
-
-
अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर याचा विवाहसोहळा आज पार पडला आहे. मराठमोळी अभिनेत्री पूजा बिरारीसोबत त्याने लग्नगाठ बांधली.
-
-
सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांचा लग्नसोहळा लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये मोठ्या थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. या विवाहसोहळ्याला बांदेकर आणि बिरारी कुटुंबीय उपस्थित होते. तसेच अनेक मराठी कलाकारांनीही या लग्नाला हजेरी लावली.
-
-
सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांच्या लग्न सोहळ्यासाठी लोणावळ्यातील रिसॉर्टमध्ये जंगी तयारी करण्यात आली होती. यावेळी संपूर्ण मंडपात फुलांची आकर्षक सजावट पाहायला मिळाली.
-
-
यावेळी लग्नमंडपात नववधू पूजा बिरारीने खास एन्ट्री घेतली होती. यामुळे तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. हा विवाहसोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला. या नवविवाहित जोडप्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
-
-
यावेळी पूजाने खास गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. तर सोहमने तिला मॅचिंग असे गुलाबी रंगाचा सलवार कुर्ता परिधान केला होता. यात ते दोघेही फारच सुंदर दिसत होते.
-
-
सोहम आणि पूजाच्या विवाहसोहळ्यापूर्वी हळदी आणि संगीत समारंभही दणक्यात साजरा करण्यात आला. सोमवारी त्यांच्या हळदीचा समारंभ पार पडला. याचेही अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
-
-
यात सोहम आणि पूजाने खूप धमाल केल्याचे पाहायला मिळाले. तर संगीत सोहळ्यामध्ये वधू-वरांसोबतच आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनीही सुंदर असा डान्स परफॉर्मन्स केला. त्यांनी केलेल्या डान्सने उपस्थितांची मने जिंकली.
-
-
गेल्या काही महिन्यांपासून सोहम-पूजाच्या लग्नाची चर्चा सुरू होती. पण त्या दोघांनाही त्यांच्या नात्याबद्दल कबुली दिली नव्हती. अखेर त्यांनी लग्नाच्या दोन दिवस आधी फोटो शेअर करत त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं. सध्या पूजा ही स्टार प्रवाह वाहिनीवरील याड लागलं प्रेमाचं या मालिकेत नायिका म्हणून काम करत आहे.