श्रावणी सोमवारी सोलापूरकरांना घडलं 1008 शिवलिंगाचे दर्शन, पाहा ड्रोनने टिपलेले मनमोहक दृश्य

श्रावण सोमवारी सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील होटगी संस्थान येथे १००८ शिवलिंगांचे दर्शन घडले. काशी पिठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक विधी पार पडले. पंचमुखी शिवलिंगाचा रुद्राभिषेक आणि सहस्त्रबिल्वार्चन यासारखे विधी झाले.

| Updated on: Aug 19, 2025 | 4:49 PM
1 / 6
श्रावण महिन्यात सोमवाराचे विशेष महत्त्व असते. यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याच उत्साहात सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील होटगी संस्थान येथे 1008 शिवलिंगांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

2 / 6
काशी पिठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी विविध धार्मिक विधी पार पडले. होटगी संस्थानच्या वीर तपस्वी मठात जगद्गुरू पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या पुतळ्याशेजारी एक भव्य शिवलिंग आणि त्याच्या शेजारी 1008 लहान शिवलिंगांची स्थापना करण्यात आली आहे.

3 / 6
श्रावण सोमवारच्या निमित्ताने हे शिवलिंग दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. या विशेष शिवलिंगांच्या दर्शनासाठी सोलापूर शहर तसेच आसपासच्या भागातून मोठ्या संख्येने भाविक आले होते.

4 / 6
यावेळी काशी पिठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी स्वतः पंचमुखी शिवलिंगाला रुद्राभिषेकासह तपोअनुष्ठान केले. तसेच, त्यांच्या हस्ते श्रावण मासानिमित्त रुद्राभिषेक, सहस्त्रबिल्वार्चन आणि महाआरती असे विधीही संपन्न झाले.

5 / 6
हे पंचमुखी परमेश्वर लिंग पंचमहाभूतांचे प्रतीक मानले जाते. या शिवलिंगाच्या निर्मितीमागील उद्देश सांगताना, हे शिवलिंग गुरुंनीच स्थापन केले असल्याचे सांगण्यात आले. या विशेष कार्यक्रमाचे विहंगम दृश्य टिपण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला.

6 / 6
या ड्रोनमधून भव्य शिवलिंगासोबतच 1008 शिवलिंगांचे मनमोहक दृश्य पाहता आले. या धार्मिक सोहळ्यामुळे सोलापूरच्या आध्यात्मिक वातावरणात एक वेगळाच उत्साह संचारला होता.