
तुळशीचे रोप प्रत्येक अंगणात असते. त्याला भारतीय परंपरेत खूप महत्व आहे. तुळसमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहे. तसेच तुळसचा सुंगध सापांना आवडत नाही. त्यामुळे तुळस लावलेल्या भागात साप जात नाही.

दवणाचा वापर शतकानुशतके पारंपारिक उपचारांमध्ये केला जात आहे. परंतु जर तुम्हाला सापांना दूर ठेवायचे असेल तर ते तुमच्या बागेत ठेवण्यासाठी दवणा ही एक उत्तम वनस्पती आहे. तिच्या तीव्र सुगंधामुळे साप येत नाही.

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असणारा लसूण सापाचा शत्रू आहे. त्याचा सुंगध सापांना आवडत नाहीत. लसूणचे रोप कुस्करून घराच्या अंगणात टाकून ठेवावे. त्यातून बाहेर पडणाऱ्या रसायनामुळे साप येत नाहीत.

चहाची चव वाढवणारी गवती चहा सापाला आवडत नाही. यामुळे घराच्या अंगणात साप येऊ नये म्हणून गवती चहाची रोप लावावी. गवती चहाच्या वासाने साप घराच्या जवळपास येणार नाही. कारण गवती चहामध्ये सिट्रोने नावाचा घटक असतो. तो सापाला दूर ठेवतो.

वर्मवुड वनस्पती ही सुद्धा सापांसाठी शत्रू आहे. ही वनस्पती तिच्या कडू वासासाठी प्रसिद्ध आहे. या वनस्पतीचा कडू वास सापांना आवडत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी ही वनस्पती लावलेली असते त्या ठिकाणी साप फिरकतसुद्धा नाही.