
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने पारंपरिक ड्रेस, सिंदूर, टिकली... अशा सिंपल लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. शिवाय काही महिला चाहत्या तर अभिनेत्रीचा प्रत्येक लूक फॉलो करतात. आता देखील अभिनेत्री साध्या लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत.

पारंपरिक ड्रेसमध्ये फोटो पोस्ट करत सोनाक्षीने कॅप्शनमध्ये 'चांदनी रातें...' असं लिहिलं आहे. सध्या चाहत्यांमध्ये सोनाक्षीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

सोनाक्षी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. नुकताच, अभिनेत्रीने बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न केलं आहे.

अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.