ओठांवर गाणं आणि डोक्यात आईची आठवण, हमसून रडणाऱ्या गायकाचा तो प्रसंग वाचून तुम्हालाही येईल रडू!
बॉलिवूडमध्ये पार्श्वगायनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अशाच काही गायकांचा प्रवासही खूप कठीण आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील दु:ख बाजूला ठेवून त्यांनी गाणी गायलेली आहेत. यातील काही गाणी तर आज अजरामर आहेत.

बॉलिवूड विश्वात कलाकाराचं आयुष्य वरवरून जरी चांगलं वाटत असलं तरीही त्या कलाकारांनी प्रसिद्धीच्या अगोदर खूप कठीण काळ काढलेला असतो. सगळे सुख, दु:ख विसरून त्यांना काम करावं लागतं.

बॉलिवूडमध्ये पार्श्वगायनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अशाच काही गायकांचा प्रवासही खूप कठीण आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील दु:ख बाजूला ठेवून त्यांनी गाणी गायलेली आहेत. यातील काही गाणी तर आज अजरामर आहेत.

प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या करिअरमध्येही असे अनेक कठीण प्रसंग येऊन गेले. सोनू निगम त्यांच्या आईवर खूप प्रेम करायचे. प्रकृती खालावल्याने लवकरच त्यांचा मृत्यू होणार होता. त्यामुळे सोनू निगम खूप रडायचे. असेच एक गाणे गाताना आईच्या आठवणीत त्यांचा कंठ दाटून आला होता.

आई लवकरच या जगातून जाणार आहे हे माहिती असल्याने सोनू निगम ते गाणे गाताना खूप भावूक झाले होते. 'अभी मुझमे कही' हे गाणे गाताना सोनू निगम आपल्या आईच्या आठवणीत खूप भावूक झाले होते.

सोनू निगमने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये ही आठवण सांगितली आहे. विशेष म्हणजे या गाण्यामुळे मला विशेष पुरस्कारही मिळाला होता, अशी आठवण सोनू निगमने सांगितलेली आहे.