PHOTO | दक्षिणेतल्या ‘लेडी सुपरस्टार्स’ बॉलिवूडमध्ये धमाका करण्यास सज्ज, पाहा कोणत्या चित्रपटातून करणार पदार्पण

| Updated on: May 24, 2021 | 10:38 AM

दाक्षिणात्य इंडस्ट्रीत आपली जादू निर्माण केल्यानंतर, साऊथच्या अनेक ‘लेडी सुपरस्टार्स’ बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यास सज्ज झाल्या आहेत. तर, बॉलिवूडमधील अनेक स्टार्स साऊथमध्ये दाखल झाले आहेत, त्यामुळे आता साऊथचे स्टार बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहेत. साऊथच्या काही सुप्रसिद्ध अभिनेत्र्या लवकरच चित्रपट आणि वेब सीरीजतून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहेत.

1 / 6

2 / 6
सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा अक्केनेनी 'द फॅमिली मॅन 2' या वेब सीरीजमधून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणार आहे. समांथा या सीरीजमध्ये अ‍ॅक्शन सीन करताना दिसणार आहे. या मालिकेचा ट्रेलर रिलीज झाला असून समांथाचा अभिनयही प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. ही सीरीज 4 जून रोजी Amazon प्राईमवर रिलीज होणार आहे.

3 / 6
‘हंगामा 2’ चित्रपटातून शिल्पा शेट्टी बऱ्याच काळानंतर बॉलिवूडमध्ये परतणार आहे. या चित्रपटात परेश रावल, मिझान जाफरी आणि प्रणिता सुभाष मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. प्रणिता ही दक्षिणची अभिनेत्री असून, या चित्रपटाद्वारे ती बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

4 / 6
रश्मिकाने अगदी लहान वयात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दक्षिणनंतर आता ती बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. रश्मिका अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटात दिसणार आहे. त्यांनी चित्रपटाच्या शुटिंगलाही सुरुवात केली आहे. याशिवाय ती अमिताभ बच्चनसमवेत ‘गुडबाय’ या चित्रपटातही दिसणार आहे. रश्मिकाने दोन्ही चित्रपटांचे शूटिंग सुरू केले आहे आणि सेटवरून फोटो शेअर केले आहेत.

5 / 6
साऊथची सुपरहिट फिल्म ‘अर्जुन रेड्डी’मधून आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री शालिनी पांडे आता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटात ती रणवीर सिंगसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर आणि शालिनीसोबत रत्ना पाठक-शाह आणि बोमन इराणीही दिसणार आहेत.

6 / 6
साऊथची अभिनेत्री अमला पॉल लवकरच वेब सीरिजमधून हिंदी सिनेमात प्रवेश करणार आहे. ती महेश भट्टच्या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. या मालिकेत ताहिर राज भसीन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेबद्दल अद्याप फारशी माहिती देण्यात आलेली नाही.