AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कंबरेत तीव्र वेदना, फिजिओथेरपी सुरू’; जुळ्या मुलांच्या जन्मानंतर टीव्ही अभिनेत्रीने शेअर केला रिकव्हरीचा कठीण काळ

डिलीव्हरीच्या चार महिन्यानंतर टीव्ही अभिनेत्रीने आता पतीसोबत काम करत टीव्हीवर पुनरागमन केलं आहे. यावेळी ती कंबरदुखी, फिजीओथेरपी आणि आई झाल्यावर रिकव्हरीला लागणारा वळेल, तो ख़डतर प्रवास- याबद्दल स्पष्टपणे बोलली.

‘कंबरेत तीव्र वेदना, फिजिओथेरपी सुरू’; जुळ्या मुलांच्या जन्मानंतर टीव्ही अभिनेत्रीने शेअर केला रिकव्हरीचा कठीण काळ
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 22, 2026 | 5:05 PM
Share

टीव्हीवरील लोकप्रिय कपल दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया, हे दोघं सध्या ‘पति पत्नी और पंगा 2’ या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. लग्नाच्या 10 वर्षांनी मे 2026 मध्ये त्यांच्या घरी जुळ्या मुलांचं आगमन झालं. डिलीव्हरीच्या जवळपास 4 महिन्यांनी हे कपल आता कामावर परतलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या दोघांनी काम आणि कुटुंबातला ताळमेळ यापासून ते दिव्यांकाची रिकव्हरी अशा विविध विषयांवर गप्पा मारल्या. डिलीव्हरीनंतर कंबरदुखीचा बराच त्रास झाल्याचं दिव्यांकाने नमूद केलं. त्यापासून आराम मिळवण्यासाठी फिजीओथेरपी आणि ॲक्वा थेरपीची मदत घेतल्याचं तिने सांगितलं.

डिलीव्हरीनंतर पूर्वीसारखं होणं सोपं नाही

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान दिव्यांकाने सांगितलं की ‘पति पत्नी और पंगा 2’ या शोद्वारे कमबॅक करण्यासाठी विवेकने मला खूप सपोर्ट केला, प्रोत्साहन दिलं. मी डिलीव्हरीनंतर पुन्हा काम करावं अशी विवेकची इच्छा होती. मात्र आई झाल्यावर कामावर परत येणं, पूर्वीसारखं सगळं सोप नाही याची जाणीव झाल्याचं दिव्यांराने नमूद केलं.

याबाबत बोलताना पुढे दिव्यांका म्हणाली, “ हा शो करण्यासाठी विवेकने मला खूप समजावलं होतं. कारण त्याला मला पुन्हा पूर्वीसारखं झालेलं पाहायचं होतं. पण आता मला समजतंय की पूर्वीसारखं होणं शक्य नाही. आधी मला वाटायचं की बाळाच्या जन्मानंतर मी पुन्हा पूर्वीसारखी होईन. पण असं होत नाही. बाळाच्या जन्मानंतर जेव्हा तुम्ही पुन्हा काम सुरू करता, तेव्हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या हा एका नव्या सुरुवातीसारखा अनुभव असतो.”

बाळाच्या जन्मानंतर शरीर पुन्हा मजबूत करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, असं दिव्यांकाने सांगितलं. या काळात चालणं, बसणं आणि उठणं यांसारख्या सामान्य गोष्टीही कठीण होऊ शकतात. शारीरिक बदलांसोबतच स्मरणशक्ती आणि मानसिक ताकद यांवरही काम करावं लागतं असं ती म्हणाली. “बाळाच्या जन्मानंतर रिकव्हरी म्हणजे शरीर पुन्हा मजबूत बनवणं. चालणं, बसणं आणि उठणं यांसारख्या छोट्या-छोट्या गोष्टीही कठीण होतात. या काळात स्मरणशक्ती आणि मानसिक ताकद यांवरही काम करावं लागतं. अशा वेळी कुटुंबीय आणि तुम्हाला साथ देणारे लोक खूप मदत करतात. सुदैवाने, विवेकने मला सर्वाधिक साथ दिली. त्याला माहीत होतं की मी खूप काळ घरात राहिले, तर मला प्रसूतीनंतरच्या नैराश्याचा (पोस्टपार्टम डिप्रेशन) सामना करावा लागू शकतो. त्यामुळे त्याची इच्छा होती की मी घराबाहेर पडावं आणि पुन्हा काम सुरू करावं.” असंही दिव्यांकाने सांगितलं.

कंबरदुखीने त्रस्त , अखेर घेतली ॲक्वाथेरपीची मदत

डिलीव्हरीनंतरच्या रिकव्हरीबद्दलही दिव्यांक स्पष्ट बोलली. बाळाच्या जन्मानंतरचे सुरुवातीचे दोन महिने माझ्यासाठी खूप कठीण होते. मला कंबरेत खूप वेदना होत होत्या आणि उठतानाही त्रास होत होता. त्यामुळे मी ॲक्वा थेरपी सुरू केली. या थेरपीमध्ये स्विमिंग पूलमधील पाण्यात व्यायाम केला जातो. त्यामुळे शरीरावर कमी ताण येतो आणि व्यायाम करणं तुलनेने सोपं होतं, असं तिने सांगितलं.

“ जेव्हा आपण रिहॅबिलिटेशनबद्दल बोललो, तेव्हा मला आठवलं की मी नेहमी सांगते की माझी रिकव्हरी चांगली झाली आहे. पण माझा हा अनुभव इतर महिलांपर्यंतही पोहोचावा, अशी माझी इच्छा आहे. मी रिहॅबिलिटेशन केलं आणि सुरुवातीचे दोन महिने माझ्यासाठी अत्यंत कठीण होते. जेव्हा आम्हाला समजलं की मी हा शो करणार आहे, तेव्हा विवेकने मला रिकव्हरीवर काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्याची इच्छा होती की मी लवकरात लवकर रिहॅबिलिटेशन सुरू करावं, कारण ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. मला उठतानाही त्रास होत होता आणि कंबरेत तीव्र वेदना व्हायच्या. त्यामुळे मी ॲक्वा थेरपी सुरू केली.” असं दिव्यांका म्हणाली. ॲक्वाथेरपी आणि फिजीओथेरपीमुळे आत्मविश्वास वाढल्याचंही तिने सांगितलं.

विवेक-दिव्यांकाचं लग्न

दिव्यांका आणि विवेक ग्नाच्या 10 वर्षआंनी पालक बनले. 26 मे 2026 ला त्यांना जुळी मुलं झाली. घरात सध्या आनंदाचं वातावरण आहे. 8 जुलै 2016 साली भोपाळमध्ये विवेक आणि दिव्यांकाचं थाटामाटात लग्न झालं.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ