IND vs SA : 21 वर्षानंतर भारतीय गोलंदाजांची इतकी वाईट अवस्था, आता जिंकण्यासाठी आकडे बदलावे लागतील तरच नवीन इतिहास घडेल

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटी टेस्ट मॅचवरील आपली पकड अधिक घट्ट केली आहे. पहिल्या इनिंगप्रमाणे दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांना विकेट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. आता ही कसोटी जिंकली तर तो चमत्कारच ठरेल.

Updated on: Nov 25, 2025 | 3:08 PM
1 / 5
गुवाहाटी टेस्ट मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने दमदार फलंदाजी केली. पहिल्या इनिंगमध्ये 489 धावा केल्या. आफ्रिकी फलंदाजांनी दुसऱ्या इनिंगमध्येही भारतीय गोलंदाजांची वाईट अवस्था केली. दक्षिण आफ्रिकेच्या टीमने 500 पेक्षा जास्त धावांची आघाडी मिळवली आहे. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील ही पाचवी वेळ आहे की, जेव्हा टीम इंडिया विरुद्ध कुठल्या संघाने दुसऱ्या डावात 500 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली आहे. यापूर्वी 2006 मध्ये पाकिस्तानने असं केलं होतं. पाकिस्तान टीमने कराची टेस्ट मॅचमध्ये हा कारनामा केलेला.  (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
भारतात असं दुसऱ्यांदा घडतय जेव्हा कुठल्या टीमने भारतीय संघाविरुद्ध 500 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली आहे. याआधी भारतात 21 वर्षांपूर्वी असं घडलं होतं. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने नागपूर टेस्ट मॅचमध्ये 542 धावांची आघाडी घेतलेली. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
दक्षिण आफ्रिकेच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर टीम इंडियासाठी मॅच जिंकण्याची शक्यता खूप धुसर आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये चौथ्या डावात सर्वाधिक यशस्वी रन चेज 418 आहे. भारतीय संघाचं यशस्वी रन चेज 387 आहे. 2008 साली चेन्नईमध्ये इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाने ही कामगिरी केलेली. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
भारतातच नाही आशिया खंडातही कुठल्याही टीमने 400 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करुन टेस्ट मॅच जिंकलेली नाही. 2021 साली चटगांव टेस्टमध्ये वेस्ट इंडिजने बांग्लादेश विरुद्ध 395 धावांचं टार्गेट चेज केलं होतं. आशिया खंडातील हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी रन चेज आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला आकडे बदलावे लागतील.  (PHOTO CREDIT- PTI)