
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांनी लग्न केल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टपासून ही चर्चा सुरू झाली की, करण आणि तेजस्वी यांनी गुपचूप पद्धतीने लग्न केले.

लग्नाची चर्चा सुरू असतानाच आता तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांनी एक अत्यंत खास फोटोशूट केले आहे. करण आणि तेजस्वी यांचे हे फोटोशूट पाहून चाहते खुश झाल्याचे दिसत आहेत.

या फोटोशूटमध्ये तेजस्वी प्रकाश ही जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. तेजस्वी प्रकाश हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसत आहे.

लग्नाच्या चर्चांवर तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्याकडून अजून काहीही रिप्लाय आला नाहीये. चाहते यांना सतत त्यांच्या लग्नाबद्दल विचारताना दिसत आहेत.

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची पहिली भेट ही बिग बाॅस 15 च्या घरात झाली होती. पहिल्याच भेटीमध्ये करण आणि तेजस्वी हे एकमेकांच्या प्रेमात पडले.