Cheap Bike : बजेट कमी असलं तरी नो टेन्शन, जावयाला गिफ्ट देण्यासाठी 5 बाईक सर्वात भारी, किंमत फक्त…
काही लोकांना बाईकचे प्रचंड वेड असते. सोबतीला बाईक असेल तर कुठेही फिरता येते. सोबतच छोट्या सामानाची ने-आणही करता येते. सध्या अशा काही खास बाईक्स आहेत, ज्यांची किंमत खूपच कमी आहे.

काही लोकांना बाईकचे प्रचंड वेड असते. सोबतीला बाईक असेल तर कुठेही फिरता येते. सोबतच छोट्या सामानाची ने-आणही करता येते. सध्या अशा काही खास बाईक्स आहेत, ज्यांची किंमत खूपच कमी आहे.
या दुचाकी रफटफ असून कित्येक वर्षे त्यांच्यावर दुरुस्तीचे काम करावे लागत नाही. कमी किंमत आणि चांगले मायलेज देणाऱ्या दुचाकींमध्ये प्रथम क्रमांवर येणारी बाईक म्हणजे स्ल्पेंडर प्लस. या बाईकची किंमत साधारण 75 हजार ते 80 हजार रुपये आहे.
दुसरी बाईक ही टीव्हीएस रायडर 125 आहे. ही बाईक दिसायला खूपच स्टायलीस दिसते. या बाईकची किंमत 95 हजार रुपये आहे. या दुचाकीला डिजीटल स्क्रीन, एलईडी लाईट्स आहेत.
तिसऱ्या क्रमांकाची दुचाकी ही बजाज पल्सर 125 आहे. स्टायलीश बाईक अशी या दुचाकीची ओळख आहे. या बाईकची एक्स शोरुम 85 ते 95 हजार रुपये आहे. या बाईकला स्पोर्टी डिझाईन आहे.
होंडा शाईन 125 ही देखील एक प्रसिद्ध आणि खिशाला परवडणारी बाईक आहे. या बाईकची किंमत ही 80 ते 85 हजार आहे. ही बाईक सुरू केल्यानंतर तिचा आवाजही खूप कमी होते. चांगले अॅव्हरेज देणारी बाईक म्हणून या दुचाकीची ओळख आहे.