AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Glowing Skin : फक्त 5 मिनिटांची सोपी ट्रिक; चेहरा होईल गुलाबी गुलाबी सुंदर दिसण्यासाठी, घरगुती उपाय ट्राय कराच

लग्न किंवा खास कार्यक्रमाआधी चेहरा फ्रेश दिसावा असं वाटतंय? मग घरातील काही पदार्थांपासून तयार करा हे सोपं उटणं आणि पाहा चमत्कार

Glowing Skin :  फक्त 5 मिनिटांची सोपी ट्रिक; चेहरा होईल गुलाबी गुलाबी सुंदर दिसण्यासाठी,   घरगुती उपाय ट्राय कराच
tips for glowing skinImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 18, 2026 | 8:51 PM
Share

कोणाचं लग्न असेल किंवा घरात कोणता क्रार्यक्रम असेल तर त्याची तयारी जवळपास महिन्याभरापासून सुरू होते. सर्वात आधी तर त्या पार्लरवालीच्या अपॉयमेंट घ्यावा लागतात. त्यातही चेहऱ्यावर ग्लो हवा तसा ग्लो येतो की नाही? हा तर मोठा प्रश्नच आहे. चेहरा छान फ्रेश आणि ग्लोईंग दिसावा यासाठी अनेक जणी पार्लरमध्ये महागडे फेशियलल आणि वेगवेगळे ब्यूटी ट्रिटमेंट घेतात. पण याची काहीही गरज नाही. उलट तुम्ही घरच्याच काही साहित्यांचा वापर करून चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो मिळवू शकता मग तर कोणत्या साईड इफेक्ट्सची सुद्धा भीती नसते.

हा पारंपरिक उपाय म्हणजे बेसन, दूध आणि हळदीपासून तयार केलेलं उटणं. हे उटणं तयार करण्यासाठी 2 चमचे बेसन घ्या. त्यात दोन ते तीन चमचे कच्चं दूध, पाव चमचा कस्तूरी हळद आणि अर्धा छोटा चमचा मध मिसळा. गरजेनुसार गुलाबजलाचे काही थेंबही घालू शकता. हे सर्व पदार्थ एकत्र करून गुळगुळीत पेस्ट तयार करा. पेस्ट खूप घट्ट किंवा पातळ नसावी.

हे उटणं लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर चेहरा,मान आणि हातांवर हलक्या हाताने लावा. साधारण 10 ते 15 मिनिटं ते राहू द्या. उटणं पूर्णपणे सुकण्याआधी हातांना थोडं पाणी लावून हलक्या हाताने स्वच्छ करा. चेहरा जोरात घासू नका. शेवटी साध्या किंवा कोमट पाण्याने चेहरा धुवून त्वचेला मॉश्चरायझर लावा.

या मिश्रणातील बेसन त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि घाण साफ करण्यास मदत करू शकतं. दुधातील लॅक्टिक अॅसिडमुळे त्वचेवरील मृत पेशी हलक्या पद्धतीने दूर होण्यास मदत होऊ शकते. मध त्वचेला ओलावा देण्यास उपयोगी ठरतो. तर कस्तुरी हळदीचा वापर पारंपरिक त्वचा निगेमध्ये केला जातो. तेलकट त्वचा असलेल्या महिलांना दुधाऐवजी दही किंवा गुलाबजल वापरण्याचा पर्यायही दिला आहे. मात्र हा उपाय केल्याने चेहऱ्यावरील डाग पूर्णपणे जातील किंवा लग्नापर्यंत त्वचा एकदम बेदाग होईल. अशी हमी नाही. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे पहिल्यांदा वापरण्यापूर्वी हातावर लावून पॅच टेस्ट करा.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण