Asia Cup : आशिया कप स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय, नक्की कारण काय?

Asian Cricket Council : आशिया कप स्पर्धेकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असतं. या स्पर्धेत आशियातील प्रमुख संघ सहभागी होतात. मात्र एसीसीने ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

| Updated on: Jun 02, 2025 | 4:59 PM
1 / 5
क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट परिषदने वूमन्स एमर्जिंग आशिया कप स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेला येत्या 6 जूनपासून सुरुवात होणार होती. स्पर्धा स्थगित करण्याचं कारण काय? जाणून घेऊयात. (Photo Credit : BCCI/SLC TWITTER)

2 / 5
चिकनगुनिया या विषाणूजन्य आजाराच्या प्रसारामुळे आणि हवामानामुळे स्पर्धा स्थगित करण्यात येत असल्याची माहिती एसीसीने सोशल मीडियावरुन दिली आहे.  श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी एसीसीचे प्रमुख मोहसिन नक्वी यांना पत्राद्वारे स्पर्धा स्थगित करण्याची विनंती केली. (Photo Credit : BCCI/SLC TWITTER)

3 / 5
शनिवारी श्रीलंकेत चिकनगुनियाला महामारी घोषित करण्यात आलं. कँडीत चिकनगुनियाचे हजारो रुग्ण आढळले. त्यामुळे खबरदारी म्हणून एमर्जिंग आशिया कप स्पर्धा स्थगित करण्यात आली. (Photo Credit : BCCI/SLC TWITTER)

4 / 5
मेन्स आशिया कप टी 20 स्पर्धा होणार की नाही? याबाबतती शंका आहे. ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार आहे. मात्र भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंधांमुळे या स्पर्धेचं आयोजन होणं अवघड असल्याचं म्हटलं जात आहे.(Photo Credit : BCCI/SLC TWITTER)

5 / 5
मेन्स आशिया कप टी 20 स्पर्धेचं आयोजन भारतात करण्यात येणार आहे. ही स्पर्धा खेळवण्यात आली तरीही पाकिस्तान भारतात येऊ शकत नाही. तसेच टीम इंडियाही पाकिस्तान विरुद्ध खेळणार नाही. (Photo Credit : BCCI/SLC TWITTER)