
आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नवा मालक मिळणार आहे. मागच्या पर्वात आरसीबीने जेतेपद पटकावलं होतं. तेव्हापासून युनाईटेड स्पिरिट्स लिमिटेड फ्रेंचायझी विकण्याचं मन केलं होतं. नोव्हेंबर महिन्यात या फ्रेंचायझींनी संघ विक्रीसाठी काढला होता. (फोटो-पीटीआय)

आरसीबी संघ घेण्यासाठी अनेकांना इच्छा प्रकट केली आहे. यात फार्मा उद्योगपती अदार पूनावाला यांचं नावही आहे. पूनावाला यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली होती. तसेच आरसीबीसाठी मोठी बोली लावण्याबाबतही सांगितलं होतं. (फोटो-पीटीआय)

अदार पूनावाला यांनी सांगितलं की, पुढच्या महिन्यात आयपीएल फ्रेंचायझी आरसीबीसाठी मोठी आणि चांगली बोली लावणार आहे. पण किती पैसे खर्च करण्यास तयार आहे हे मात्र गुलदस्त्यातच ठेवलं आहे. (फोटो-पीटीआय)

रिपोर्टनुसार, आरसीबी फ्रेंचायझीसाठी 18 ते 20 हजार कोटी रुपये मोजावे लागू शकतात. आरसीबी आयपीएलमधील महागड्या संघापैकी आहे. या संघात विराट कोहली आणि स्मृती मंधानासारखे खेळाडू आहेत. (फोटो-पीटीआय)

अदार पूनावाला अब्जाधीश असून त्याची संपत्ती 2 लाख कोटींची आहे. अदार पूनावाला सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचा सीईओ आहे. (फोटो-इंस्टाग्राम)