
भारत आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. पहिल्याच कसोटी सामन्यात खऱ्या अर्थाने भारताचा कस लागणार आहे. बांगलादेशने पाकिस्तानला 2-0 ने पराभूत करत उलटफेर करण्याची ताकद दाखवून दिली आहे. असं असलं तरी पहिल्या सामन्यात भारत एक विक्रम रचू शकतो.

दोन सामन्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशला पराभूत केलं. कसोटी क्रिकेट इतिहासात दक्षिण अफ्रिकेशी बरोबरी साधणार आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका कसोटी विजयात बरोबरीत येणार आहे. दक्षिण अफ्रिकेने आतापर्यंत 179 कसोटी सामने जिंकले आहेत. तर भारताने 178 कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे.

भारताने चेन्नईतील पहिल्याच सामन्यात बांगलादेशला पराभूत केलं तर 179 विजय होतील. तर दुसरा सामना कानपूरला होणार आहे. या सामन्यात विजय मिळवला तर दक्षिण अफ्रिकेला मागे टाकत पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थान झेप घेईल.

कसोटी विजयाच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 414 कसोटी सामने जिंकले आहेत. या शर्यतीत कोणताही संघ आसपास नाही. इंग्लंडने 397 कसोटी सामने जिंकत दुसरं स्थान गाठलं आहे. वेस्ट 183 कसोटी विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे.

दुसरीकडे, भारतीय संघाने विजय मिळवताच कसोटी सामन्याचा तराजू हा विजयाच्या बाजूने झुकलेला दिसेल. आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय संघाने विजयापेक्षा कसोटी सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. पण पहिल्या सामन्यात विजय मिळवाताच विजयी सामन्यांची संख्या पराभवाच्या तुलनेत जास्त होईल. असं भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच होणार आहे. (सर्व फोटो- BCCI)