आयपीएल मेगा लिलावात Unsold असलेल्या खेळाडूंवर पंजाब किंग्सची नजर, का ते जाणून घ्या

आयपीएलचं 18वं पर्व सुरु होण्यासाठी अवघ्या एखाद दीड महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेपूर्वी मेगा लिलावत पंजाब किंग्सने मोठी बोली लावत श्रेयस अय्यरला संघात खेचून घेतलं. पॉकेटमध्ये मोठी रक्कम असल्याने दिग्गज खेळाडूंचा भरणा केला. पण आता न विकलेल्या खेळाडूंवर पंजाब किंग्सची नजर आहे. त्याचं कारण असं की...

| Updated on: Jan 28, 2025 | 6:14 PM
1 / 5
आयपीएल 2025 स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच पंजाब किंग्सला धक्का बसला. या स्पर्धेसाठी ठरवलेल्या रणनितीला स्पर्धेपूर्वीच खिळ बसली आहे. त्याचं झालं की, ऑस्ट्रेलियन खेळाडू जोश इंग्लिस जखमी झाला आहे. दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेपूर्वी रिकव्हर होणं कठीण दिसत आहे. त्यामुळे पंजाब किंग्सने शोधाशोध सुरु केली आहे.

2 / 5
जोश इंग्लिस पायाच्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून आऊट झाला आहे. त्याची दुखापत पाहता आयपीएल स्पर्धेसाठी फिट होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे त्याच्या ऐवजी संघात कोणाला घेता येईल यासाठी प्रयत्न आतापासूनच सुरु झाल्याचं बोललं जात आहे.

3 / 5
आयपीएल लिलावात कोणीही भाव न दिलेल्या खेळाडूंवर पंजाब किंग्सची करडी नजर आहे. अनसोल्ड खेळाडूंपैकी एकाची निवड संघात करण्याची शक्यत आहे. त्यासाठी काही दिग्गज खेळाडूंची नावे पुढे येत आहेत.

4 / 5
डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, जॉनी बेअरस्टो, मयंक अग्रवाल, शार्दुल ठाकूर, स्टीव्ह स्मिथ, रिले रोसोव्ह, पृथ्वी शॉ, अल्झारी जोसेफ हे न विकले गेलेले स्टार खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी एकाला पंजाब किंग्जमध्ये संधी मिळाली तर आश्चर्य वाटायला नको.

5 / 5
पंजाब किंग्ज संघ: श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, हरप्रीत ब्रार, विजयकुमार वैशाक, यश ठाकूर, मार्को जॅन्सन, लकी फर्ग्युसन, अजमतुल्ला ओमरजाई, आरोन हार्डी, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, झेवियर ब्रॅटलेट, पायला अविनाश, प्रवीण दुबे, नेहल वढेरा, हरनूर पन्नू, कुलदीप सेन, जोश इंग्लिस (दुखापतग्रस्त)