
लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडला क्रिकेटची पंढरी म्हंटलं जातं. या मैदानाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. अनेक फलंदाजांचं या मैदानात शतक तर गोलंदाजांचं 5 विकेट्स घेण्याचं स्वप्न असतं. मात्र तसं करणं प्रत्येकाला जमतंच असं नाही. भारतासाठी 6 दिग्गज फलंदाजांनी अंसख्य वर्ल्ड रेकॉर्ड केले. मात्र त्यांना या मैदानात शतक करता आलेलं नाही. ते कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (Photo Credit : @HomeOfCricket)

भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांना लॉर्ड्समध्ये शतक करता आलं नाही. गावसकरांनी कसोटी कारकीर्दीत लॉर्ड्समध्ये एकूण 5 सामने खेळले आहेत. गावसकरांनी या मैदानातील 10 डावांत 340 धावा केल्या. मात्र त्यांना एकदाही शतक करता आलं नाही. गावसकरांची या मैदानात 59 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. (Photo Credit : Getty Images)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचं शतकं करणाऱ्या सचिन तेंडुलकर यालाही लॉर्ड्समध्ये एका डावात 100 धावा करता आल्या नाहीत. सचिनने लॉर्डसमधील 5 सामन्यांमधील 9 डावांत 195 धावा केल्या. सचिनला या मैदानात अर्धशतकही करता आलं नाही. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

माजी दिग्गज विजय हजारे यांनी या मैदानातील 2 सामन्यांमधील 4 डावात एकूण 183 धावा केल्या आहेत. त्यांची या मैदानातील 69 ही सर्वोच्च धावसंख्या राहिली. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

भारताचे दिग्गज कर्णधार कपिल देव आणि माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण हे दोघेही या मैदानात शतक करण्यात अपयशी ठरलेत. देव यांनी या मैदानात 4 सामन्यांमधील 7 डावांत 242 धावा केल्या आहेत. देव यांचा या मैदानात 89 हायस्कोअर आहे. तर लक्ष्मणने या मैदानात खेळलेल्या 3 सामन्यांमधील 6 डावांत 237 धावा केल्या आहेत. लक्ष्मणची या मैदानातील 74 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. ( Photo Credit : AFP and Tv9 Bharatvarsh)

माजी दिग्गज अजित वाडेकर यांनी त्यांच्या नेतृत्वात भारताला इंग्लंडमध्ये पहिल्या कसोटी सामना जिंकून दिला होता. मात्र वाडेकर यांनाही लॉर्ड्समध्ये शतक करता आलं नाही. वाडेकर यांनी या मैदानातील 3 सामन्यांमधील 6 डावांत 187 धावा केल्या. त्यांचा लॉर्ड्समधील 87 हा हायस्कोर आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)