World Squash Junior Championship 2026: भारताची अनाहत सिंह वर्ल्ड चॅम्पियन, 16 वर्षात पहिल्यांदा घडलं
वर्ल्ड ज्युनिअर स्क्वॅश चॅम्पियनशिप जिंकणारी अनाहत सिंह पहिली भारतीय ठरली आहे. यासह तिने इजिप्तचा या स्पर्धेतील दबदबा संपुष्टात आणला आहे. तिच्या या कामगिरीनंतर संपूर्ण देशात तिचं कौतुक होत आहे.

भारताची अनाहत सिंह हीने वर्ल्ड स्क्वॅश ज्युनिअर चॅम्पियन स्पर्धेत इतिहास रचला आहे. अशा कामगिरी करणारी पहिली भारतीय ठरली आहे. यासह तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गेल्या 16 वर्षांपासून सुरू असलेला एक अध्याय संपवला आहे. (Photo: PTI)

18 वर्षीय अनाहत सिंहने वर्ल्ड स्क्वॅश ज्युनिअर चॅम्पियनशिप अंतिम फेरीत इजिप्तच्या रुक्या सालेमला 3-0 ने मात देत विजेतेपद पटकावलं. तिने या स्पर्धेत रुक्या सालेमला हावी होण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे तिला शरणागती पत्कारण्याशिवाय पर्यायच उरला नाही. (Photo: PTI)

अनाहत सिंहने वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत जेतेपद पटकावून नावलौकिक मिळवला असं नाही. तर गेल्या 16 वर्षांपासून या स्पर्धेवर इजिप्त एकछत्री अंमल होता. अखेर त्यांची विजयी मालिका संपुष्टात आणली. तसेच हे जेतेपद जिंकणारी पहिली भारतीय ठरली. (Photo: PTI)

जागतिक ज्युनिअर स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेतील 16 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच इजिप्तबाहेरील खेळाडू विजेता ठरला. अनाहत सिंहने ही कामगिरी केली. तिच्या कामगिरीमुळे कॅनेडियन स्क्वॅश कोर्टवर भारताचा झेंडा अभिमानाने फडकला. (Photo: X)

अनाहत सिंह आधी अमेरिकेच्या अमांडा सोभी हीने जागतिक ज्युनिअर स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेत जेतेपद मिळवलं होतं. तिे 2010 मध्ये हा कारनामा केला होता. मात्र त्यानंतर सलग इजिप्तच्या खेळाडूंनी जेतेपदावर नाव कोरलं होतं. (Photo: PTI)