Anderson-Tendulkar Trophy: भारत-इंग्लंड मालिकेसाठी नवीन कसोटी ट्रॉफी लाँच, जाणून घ्या काय आहे खासियत

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला काही तासात सुरु होणार आहे. याआधी या कसोटी मालिकेला अँडरसन-तेंडुलकर हे नाव देण्यात आलं. तसेच ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं. काय आहे खासियत ते जाणून घ्या.

| Updated on: Jun 19, 2025 | 9:53 PM
1 / 5
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होत आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी या मालिकेला एक नवीन नाव देण्यात आले आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी म्हणून ओळखली जाईल. यापूर्वी पतौडी ट्रॉफी म्हणून ओळखली जात होती. (फोटो-GETTY IMAGES)

2 / 5
गुरुवारी लीड्सच्या मैदानावर दिग्गज क्रिकेटपटूच्या उपस्थितीत नव्या ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं. जेम्स अँडरसन आणि सचिन तेंडुलकर यांनी या ट्रॉफीचं अनावर केलं. (फोटो-GETTY IMAGES)

3 / 5
गुरुवारी लाँच केलेल्या ट्रॉफीवर अँडरसनची गोलंदाजीची एक्शन आणि सचिन तेंडुलकरचा कव्हर ड्राईव्ह मारत असलेल्या फोटो कोरला आहे. (फोटो-GETTY IMAGES)

4 / 5
भारत-इंग्लंड मालिकेच्या या नवीन ट्रॉफीवर सचिन आणि अँडरसन यांचे स्वाक्षरीपत्र देखील आहे. या ट्रॉफीवर लिहिले आहे की ही ट्रॉफी भारत आणि इंग्लंडमधील कसोटी मालिका जिंकणाऱ्या संघाला दिली जाईल. (फोटो-GETTY IMAGES)

5 / 5
पूर्वी ही ट्रॉफी पतौडी ट्रॉफी म्हणून ओळखली जात होती पण आता विजेत्या संघाच्या कर्णधाराला पतौडी पदक दिले जाईल. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड  आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांच्या संयुक्त पुढाकाराने असा निर्णय घेण्यात आला. (फोटो-GETTY IMAGES)