अर्जुन तेंडुलकवर लागणार बोली, लिलावासाठी 5 लाखांची मूळ किंमत; कसं काय ते जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेत अर्जुन तेंडुलकर हा लखनौ सुपर जायंट्सचा भाग आहे. मात्र त्याला अद्याप खेळण्याची संधी मिळालेली नाही. असं असताना 5 लाखांच्या बेस प्राईससह मुंबई टी20 लीग स्पर्धेच्या लिलावात सहभागी झाला आहे.

| Updated on: Apr 29, 2026 | 7:55 PM
1 / 5
आयपीएल 2026 मध्ये लखनौ सुपरजायंट्स संघाचा भाग असलेल्या अर्जुन तेंडुलकरला आतापर्यंत खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण लखनौ संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर अर्जुनला संघाकडून खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. असं असताना अर्जुन तेंडुलकरने दुसऱ्या लीगमध्ये खेळण्यासाठी लिलावाकरिता आपले नाव नोंदवले आहे. (Photo: PTI)

2 / 5
मुंबई टी20 लीगसाठी लिलाव प्रक्रिया 2 मे रोजी होणार आहे. अर्जुन देखील 5 लाख रुपयांच्या मूळ किमतीसह या लिलावात दिसणार आहे. वास्तविक, अर्जुन तेंडुलकर गोव्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो, पण असे असूनही त्याला मुंबई टी20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे.  (Photo: PTI)

3 / 5
अर्जुन तेंडुलकर सध्या गोवा रणजी संघाकडून खेळत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या नियमांनुसार, संघात परतणाऱ्या कोणत्याही मुंबईस्थित खेळाडूला एक वर्षाचा 'कूलिंग-ऑफ' कालावधी पूर्ण करावा लागतो. परंतु एमसीए सचिव उन्मेश खानविलकर यांनी सांगितले की, हा नियम अर्जुन तेंडुलकरला लागू होत नाही, कारण त्याने कोणत्याही गोवा टी20 लीगमध्ये भाग घेतलेला नाही. (Photo: PTI)

4 / 5
भारताचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे हे देखील टी20 मुंबई लीगमध्ये खेळणार आहेत. या तिन्ही खेळाडूंना त्यांच्या संबंधित संघांनी कायम ठेवले आहे. यशस्वी जयस्वाललाही बांद्रा ब्लास्टर्सने घेतलं आहे. परंतु अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यामुळे त्याच्या लीगमध्ये सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. (Photo: PTI)

5 / 5
आयपीएल 2026 च्या आधी लखनौ सुपरजायंट्सने त्याला ट्रेडिंगद्वारे 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले होते. मात्र, त्याला अद्याप संधी मिळालेली नाही. तथापि, लखनौ सुपरजायंट्सचे व्यवस्थापन त्याला कधी मैदानात उतरवेल हे पाहणे बाकी आहे. (Photo: PTI)

Follow Us