ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू एश्ले गार्डनरने अफेअरच्या आरोपांवर मौन सोडलं, घटस्फोटीत पत्नीबाबत म्हणाली…

ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची उपकर्णधार एशले गार्डनर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या कथित अफेअर प्रकरणावर तिने मौन सोडले आहे. एश्ले गार्डनरने लग्नात आणि नात्यात विश्वासघात केल्याचा आरोप केला होता.

| Updated on: Aug 13, 2026 | 6:56 PM
1 / 5
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू एश्ले गार्डनरचं तिची जोडीदार मोनिका राइटसोबत लग्न झाले होते. ऑस्ट्रेलियन सरकारने डिसेंबर 2017 मध्ये एका ऐतिहासिक कायद्याद्वारे समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिली होती. त्यानंतर 26 एप्रिल 2025 रोजी या दोघींनी लग्नगाठ बांधली होती. सात महिने संसास थाटल्यानतंर दोघींनी घटस्फोट घेतला.  त्यानंतर मोनिकाने एश्ले गार्डनर फसवणूक केल्याचा आरोप केला. त्यावर एश्ले गार्डनरने इंस्टाग्रामवर पोस्ट करून स्पष्टीकरण दिलं आहे.

2 / 5
एश्ले गार्डनरने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, "मी मोनिकासोबत घालवलेल्या वेळेबद्दल आभारी आहे आणि यामुळे झालेल्या वेदनांबद्दल दिलगीर आहे. मी तिच्या भविष्यासाठी सुख आणि यशासाठी शुभेच्छा देते.'

3 / 5
एश्ले गार्डनरने पुढे लिहिलं की,  'मी सध्या या प्रकरणी कोणतीही सार्वजनिक टिप्पणी करणार नाही आणि यात सामील असलेल्यांच्या गोपनीयतेचा आदर राखला जावा अशी माझी विनंती आहे.'

4 / 5
एश्लेचं ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघातील सहकारी खेळाडू जॉर्जिया व्होलसोबत अफेअर असल्याचं मोनिकाने सांगितलं आहे. इतकंच काय तर तिच्यासाठी फसवल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मौन बाळगल्याने मोनिका राइटने टीका केली आहे. फसवणूक करणारी व्यक्ती ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची उपकर्णधार किंवा रोल मॉडेल राहण्यास पात्र नाही, असं टीकास्त्र तिने सोडलं.

5 / 5
मोनिका राईटने सांगितलं की, "माझा विश्वास आहे की, जर तुम्हाला तुमच्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान मिळत असेल आणि एक आदर्श म्हणून ओळखले जात असाल, तर तुम्ही तुमची नैतिक मूल्ये देखील जपली पाहिजेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या मुद्द्यावर सार्वजनिकरित्या भाष्य का केले नाही, हे मला समजत नाही." (सर्व फोटो: टीव्ही 9 हिंदीवरून)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us