Asia Cup 2023 | आशिया कपमध्ये टीम इंडिया पाकिस्तान शिवाय आणखी कोणत्या टीम विरुद्ध खेळणार?
Indian Cricket Team Matches in Asia Cup 2023 | आशिया कप स्पर्धेचा थरार 30 ऑगस्टपासून रंगणार आहे. आशिया कपमधील टीम इंडियाच्या सामन्यांना किती वाजता सुरुवात होणार हे जाणून घ्या.

वर्ल्ड कपआधी 30 ऑगस्टपासून आशिया कप 2023 स्पर्धेला सुरुवात होतेय. टीम इंडिया पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने आशिया कप मोहिमेला सुरुवात करणार आहे. आशिया कपमध्ये 2 सप्टेंबरला टीम इंडिया- पाकिस्तान असा सामना होणार आहे.

टीम इंडिया आशिया कपमध्ये रोहित शर्मा याच्या नेतृत्वात खेळणार आहे. दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ 2 सप्टेंबरला आमनेसामने असणार आहेत.

टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना हा श्रीलंकेतील कँडी येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे.

टीम इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळ हे 3 संघ ए ग्रुपमध्ये आहेत. एकूण 6 संघ 2 ग्रुपमध्ये विभागले गेले आहेत.

टीम इंडिया विरुद्ध नेपाळ 4 सप्टेंबरला आमनेसामने असणार आहेत. हा सामना श्रीलंकेतील पल्लकले इथे होणार आहे. या सामन्यालाही दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे.

तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे 3 संघ बी ग्रुपमध्ये आहेत. दोन्ही ग्रुपमधील पहिले 2 संघ सुपर 4 साठी क्वालिफाय करतील.

सुपर 4 मधून दोन्ही ग्रुपमधील अव्वल संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. आशिया कपमधील अंतिम सामना हा 17 सप्टेंबरला कोलंबोत पार पडणार आहे.