
आशिया कप 2023 सुपर 4 मधील तिसरा सामन्यात पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने असणार आहेत. हा सामना 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांना साखळी फेरीत विशेष काही करता आलं नाही. मात्र काही खेळाडू हे यातही चमकले. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि ईशान किशन तिघे गेमचेंजर ठरु शकतात.

विराटने पाकिस्तान विरुद्धच्या साखळी फेरीत 4 धावाच केल्या. मात्र विराट आता 10 तारखेच्या सामन्यात धमाका करु शकतो. विराटने आशिया कपमध्येच पाकिस्तान विरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये हायस्कोअर केला होता.

हार्दिक पंड्या ऑलराउंडर आहे. हार्दिकने पाकिस्तान विरुद्ध 90 बॉलमध्ये 87 धावांची खेळी केली होती. हार्दिकने या सामन्यात 7 चौकार आणि 1 सिक्स ठोकला होता. त्यामुळे हार्दिककडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.

ईशान याने पाकिस्तान विरुद्ध हार्दिकसोबत शतकी भागीदारी केली होती. ईशानने 82 धावा केल्या होत्या. आता ईशानला संधी मिळाल्यास धमाका करु शकतो.

तसेच कॅप्टन रोहित शर्मा याने नेपाळ विरुद्ध शुबमन गिल याच्यासोबत विजयी सलामी भागीदारी केली होती. मात्र त्याला पाकिस्तान विरुद्ध फक्त 11 धावाच करता आल्या. आता रोहित पाकिस्तान विरुद्ध कसा खेळतो, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.