
रोहित शर्मा याला आशिया कपमध्ये कर्णधार म्हणून 2 रेकॉर्ड करण्याची संधी आहे. रोहित शर्मा याने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला 8 पैकी 9 सामन्यात विजय मिळवून दिला आहे. आता टीम इंडिया आशिया कप सुपर 4 मधील पुढील सामना 15 सप्टेंबरला बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाने बांगलादेश विरुद्ध विजय मिळवल्यास रोहितच्या नावावर 2 विक्रम होतील.

आशिया कप स्पर्धेला 1984 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत एकाही भारतीय कर्णधाराला आपल्या नेतृत्वात 10 सामने जिंकूने देता आलेले नाहीत.

कॅप्टन रोहितने बांगलादेश आणि अंतिम सामन्यात विजय मिळवून दिल्यास तो आशिया कपमध्ये टीम इंडियाला 10 विजय मिळवून देणारा पहिला भारतीय कर्णधार ठरेल.

रोहितने आतापर्यंत आशिया कपमध्ये (वनडे फॉर्मेट) कर्णधार म्हणून एकही सामना गमावलेला नाही. तसेच रोहित आता महेंद्रसिंह धोनी याचा रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या उंबरठ्यावर आहे.

रोहितने आतापर्यंत आशिया कपमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. रोहितच्या नेतृत्वातच टीम इंडियाने 2018 साली अखेरचा आशिया कप जिंकला होता. तसेच रोहितने आशिया कप 2023 मध्ये नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका विरुद्ध सलग 3 अर्धशतकं ठोकलीत.