
भारताचं एसीसी आशिया कप रायझिंग स्टार 2025 स्पर्धेतील प्रवास आटोपला आहे. उपांत्य फेरीत बांगलादेशने सुपर ओव्हरमध्ये भारताला पराभवाची धूळ चारली. असं असताना 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची ख्याती आता क्रिकेट जगतात झाली आहे. त्याच्या खेळीची दखल आता वरिष्ठ पातळीवर घेतली जात आहे. (Photo: Asian Cricket Council)

वैभव सूर्यवंशीने एसीसी आशिया कप स्पर्धेसाठी त्याची संघात झालेली निवड योग्यच ठरवली आहे. त्याने या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यांपर्यंत 98 चेंडूत 239 धावा केल्या आहेत. तसेच सर्वाधिक चौकार आणि षटकारही मारले आहेत. त्याने 20 चौकार आणि 22 षटकार मारले. (Photo: Asian Cricket Council)

वैभव सूर्यवंशीने बांग्लादेश ए संघाविरुद्ध 15 चेंडूत 38 धावांची खेळी केली. यात 4 षटकार आणि 2 चौकार मारले. या खेळीसह वैभव या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. या खेळीसह त्याने या स्पर्धेत नवी उंची गाठली आहे. (Photo: Asian Cricket Council)

14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने 4 सामन्यात 98 चेंडूंचा सामना केला. युएई, पाकिस्तान, ओमान आणि उपांत्य फेरीत बांगलादेशविरुद्ध सामना खेळला. यात त्याने 239 धावा केल्या. इतकंच काय तर वैभवने या दरम्यान 20 चौकार आणि सर्वाधिक षटकार मारले. (Photo: Asian Cricket Council)

वैभव सूर्यवंशीने या स्पर्धेतील एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला. त्याने युएईविरूद्धच्या सामन्यात 42 चेंडूत 144 धावांची खेळी केली. इतकंच काय तर या स्पर्धेत त्याचा स्ट्राईक रेटही चर्चेचा विषय राहिला. त्याने 243.87 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. (Photo: Asian Cricket Council)

वैभव सूर्यवंशीने उपांत्य फेरीत केलेल्या 38 धावांनंतर पाकिस्तानच्या माज सदाकतच्या पुढे निघून गेला आहे. सदाकडने उपांत्य फेरीपर्यंतच्या सामन्यात 4 सामन्यात 235 धावा केल्या. यात 17 चौकार आणि 17 षटकार आहेत. आता अंतिम फेरी गाठण्यात पाकिस्तान अपयशी ठरलं तर वैभवचं नंबर एक राहील. पाकिस्तानचा संघाने अंतिम फेरी गाठली आणि माज सदाकत 3 धावा करून बाद झाला तरी वैभवला नंबर 1 ची संधी आहे. (Photo: Asian Cricket Council)