एशियन्स गेम्स स्पर्धेपूर्वी आणखी एक धक्का, अभिषेक पालला नाडाची नोटीस! नेमका काय आहे प्रकार

एशियन गेम्स 2026 स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. लाँग डिस्टेंस रनर अभिषेक पाल अडचणीत आला आहे. कारण नॅशनल अँटी डोपिंग एजेंसी अर्थात नाडाने डोपिंग प्रकरणी त्याला एक नोटीस बजावली आहे.

| Updated on: Aug 29, 2026 | 9:59 PM
1 / 5
जापानध्ये एशियन्स गेम्स स्पर्धा होणार असून आता तयारी अंतिम टप्प्यात आहे. असं असताना भारतीय एथलेटिक्स संघातून एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. भारताचा लाँग डिस्टेंस रनर अभिषेक पाल डोपिंग प्रकरणाता नाडाच्या रडारवर आला आहे. नाडाने त्या नोटीस पाठवली आहे.  (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

2 / 5
नाडाने अभिषेक पालवर अजून तरी बंदी घातलेली नाही. पण सध्या घडत असलेल्या घडामोडी पाहता एशियन्स गेम्समध्ये त्याला भाग घेणं कठीण असल्याचं दिसत आहे.  रिपोर्टनुसार, अभिषेक पॉलच्या डोप सँपलमध्ये प्रतिबंधित पदार्थ आढळला आहे.  (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

3 / 5
प्रथमदर्शी प्रतिबंधित पदार्थ महिलांच्या प्रजनन क्षमतेवरील औषधाचा भाग असण्याची शक्यता आहे. पण पुरूष खेळाडूच्या नमुन्यात हा पदार्थ आढळणं आश्चर्यकारक आहे. त्यामुळे या प्रकरणात स्पष्टता असावी यासाठी अभिषेक पाल नाडाशी संपर्क साधू शकतो.  (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

4 / 5
अभिषेक पालची निवड एशियन्स गेम्ससाठी निवडलेल्या 72 सदस्यीय एथलेटिक्स संघात झाली आहे. या स्पर्धेत 5 हजार मीट आणि 10 मीटर शर्यतीत भाग घेणार आहे. नाडाची चौकशी वेळेत झाली नाही किंवा कठोर कारवाई झाली तर भाग घेणं कठीण आहे. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

5 / 5
अभिषेक पालने जूनमध्ये झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्यीय चॅम्पियनशिपमध्ये 10 हजार मीटरमध्ये सुवर्ण, 5 हजार मीटरमध्ये रौप्य पदक पटकावलं होतं. तसेच 2023 मध्ये एथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत 10 मीटरमध्ये कांस्य पदक पटकावलं होतं.  (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

Follow Us