Rohit Sharma च्या निशाण्यावर 8 रेकॉर्ड्स, ऑस्ट्रेलिया विरुद्ध विक्रमांचा पाऊस फिक्स!

Rohit Sharma Record AUS vs IND : हिटमॅन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे. रोहितला या मालिकेत तब्बल 8 विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे.

| Updated on: Oct 16, 2025 | 4:24 PM
1 / 5
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 19 ऑक्टोबरपासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेने होणार आहे.  रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीचं कमबॅक हे या मालिकेचं वैशिष्ट्य आहे. दोघेही 7 महिन्यांनी भारतीय संघात कमबॅक करत असल्याने यांना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.  (Photo Credit: PTI)

2 / 5
रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरूद्ध  या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करण्याची संधी आहे. रोहितच्या निशाण्यावर या मालिकेत 1-2 नाही तर तब्बल 8 विक्रम आहेत. या विक्रमांबाबत आपण जाणून घेऊयात. (Photo Credit: PTI)

3 / 5
रोहितने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11 हजार 168 धावा केल्या आहेत. रोहितने यापैकी 7930 धावा या भारताच्या विजयी सामन्यांमध्ये केल्या आहेत. त्यामुळे रोहितला भारताच्या विजयी सामन्यांमध्ये 8 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 30 धावांची गरज आहे. तसेच रोहित 10 धावा करताच ऑस्ट्रेलियात वनडे क्रिकेटमध्ये 1 हजार धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरेल. (Photo Credit: PTI)

4 / 5
तसेच रोहितकडे पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहिद आफ्रिदी याला मागे टाकून वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक षटकारांचा विश्वविक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. रोहितला त्यासाठी फक्त 8 सिक्सची गरज आहे. (Photo Credit: PTI)

5 / 5
तसेच रोहितकडे टीम इंडियासाठी वनडेत सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज होण्याचा बहुमान मिळवण्याची संधी आहे. रोहितला त्यासाठी 196 धावांची गरज आहे. तसेच रोहित 174 धावाच करताच टीम इंडियासाठी सर्वाधिक रन्स करणारा पहिला ओपनर ठरेल. (Photo Credit: PTI)