
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेला 29 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा कॅनबेरामध्ये होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार 1 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा एक गोलंदाज या मालिकेत ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरु शकतो. या गोलंदाजाने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाला बॉलिंगने चांगलाच त्रास दिला आहे. (Photo Credit: PTI)

टीम इंडियाचा अनुभवी ऑलराउंडर अक्षर पटेल याने आपल्या फिरकीने कांगारुंना चांगलंच रडवलं आहे. अक्षरने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या 9 टी 20i सामन्यांमध्ये 6.30 च्या इकॉनमी रेटने 15 विकेट्स घेतल्या आहेत. (Photo Credit: PTI)

तसेच जसप्रीत बुमराह याने ऑस्ट्रलेया विरुद्ध सर्वाधिक टी 20i विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहने 17 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहने 8 च्या इकॉनमी रेटने या दरम्यान धावा दिल्या आहेत. (Photo Credit: PTI)

चायनामॅन फिरकीपटू कुलदीप यादव याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 टी 20i विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीपने 6.33 च्या इकॉनमीने रन्स दिल्या आहेत. या आकडेवारीवरुन ऑस्ट्रेलियाचे फलंदाज कुलदीपसमोर जास्त धावा करण्यात निष्प्रभ ठरतात, हे सिद्ध होतं. (Photo Credit: PTI)

तसेच ऑस्ट्रेलियाला मायदेशात भारताला टी 20i मालिकेत आतापर्यंत पराभूत करता आलेलं नाही. उभयसंघात एकूण 4 टी 20i मालिका खेळवण्यात आल्या आहेत. भारताने 4 पैकी 2 मालिका जिंकल्या आहेत. तसेच भारताने 2 मालिका या बरोबरीत सोडवल्या आहेत. (Photo Credit: PTI)