WTC 2025 जेतेपदासाठी ऑस्ट्रेलिया-अफ्रिका आमनेसामने, पण टीम इंडियाला मिळणार कोट्यवधी; कारण…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेचा अंतिम सामना 11 जूनपासून सुरु होणार आहे. अवघ्या काही तासात सामन्याला सुरुवात होणार आहे. जेतेपदासाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने येणार आहेत. पण या सामन्याआधीच टीम इंडियाला कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. कसं का ते जाणून घ्या.

| Updated on: Jun 10, 2025 | 4:40 PM
1 / 5
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत तिसऱ्यांदा जागा मिळवण्यात टीम इंडियाला अपयश आलं. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका गमवल्याने ही वेळ आली. असं असूनही भारतीय क्रिकेट संघाला आयसीसीकडून मोठी रक्कम मिळणार आहे. (Photo- PTI)

2 / 5
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 गुणतालिकेत टीम इंडियाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं. आता जेतेपदासाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका हे संघ भिडणार आहे. गतविजेत्या ऑस्ट्रेलियासमोर किताब वाचवण्याचं आव्हान आहे. तर दक्षिण अफ्रिका पहिल्यांदा जेतेपद मिळवण्याचा प्रयत्न आहे. (Photo- PTI)

3 / 5
आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पुरस्काराची रक्कम जवळपास 49.28 कोटी केली आहे. मागच्या पर्वाच्या तुलनेत ही रक्कम दुप्पट आहे. अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला 30.88 कोटी, तर उपविजेत्या संघाला 18.50 कोटी रुपये मिळणार आहेत. (Photo- PTI)

4 / 5
वर्ल् टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे जवळपास 12.32 कोटी रुपये मिळतील. मागच्या पर्वात ऑस्ट्रेलियाला जेतेपदानंतर ही रक्कम मिळाली होती. आयसीसीने कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसाची रक्कम वाढवली आहे. (Photo- PTI)

5 / 5
भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2019-21, 2021-23 स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागा मिळवली होती. तर यंदाही अंतिम फेरीच्या शर्यतीत आघाडीवर होती. पण न्यूझीलंडविरुद्धची मालिका 3-0 ने गमावल्याने मोठा फटका बसला. यामुळे विजयी टक्केवारी घसरली. तसेच दक्षिण अफ्रिकेने श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभूत करून 69.44 विजयी टक्केवारी केली. ऑस्ट्रेलिया 67.54 टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर राहीला. तर भारतीय संघ 50 टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर राहीला.(Photo- PTI)