Retirement | टीमला मोठा झटका, आशिया कप-वर्ल्ड कपआधी स्टार बॅट्समनची तडकाफडकी निवृत्ती

Cricket | आशिया कप आणि त्यानंतर वनडे वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. त्याआधी टीमच्या मोठ्या खेळाडूने निवृत्तीचा निर्णय घेतल्याने मोठा झटका लागला आहे.

Sanjay patil | Updated on: Jul 06, 2023 | 6:47 PM
1 / 6
वनडे वर्ल्ड कप 2007 मध्ये टीम इंडियाला पराभवाचा हिसका दाखवणारा बांगलदेशचा अनुभवी फलंदाज तमीम इक्बाल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

वनडे वर्ल्ड कप 2007 मध्ये टीम इंडियाला पराभवाचा हिसका दाखवणारा बांगलदेशचा अनुभवी फलंदाज तमीम इक्बाल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

2 / 6

तमीम इक्बाल याने आशिया कप आणि वनडे वर्ल्ड कप 2023 आधी निवृत्ती जाहीर केल्याने बांगलादेशला मोठा झटका लागला आहे.

3 / 6

तमीम इक्बाल याने बांगलादेशचं कसोटी, वनडे आणि टी 20 अशा तिन्ही फॉरमेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.

4 / 6

तमीमने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत 70 कसोटी, 241 एकदिवसीय आणि 78 टी 20 सामने खेळले आहेत.

5 / 6

तमीमने कसोटीमध्ये 5 हजार 134 धावा केल्या आहेत. तर टी 20 क्रिकेटमध्ये इक्बालच्या नावे 1 हजार 758 धावांची नोंद आहे.

6 / 6

तर तमीमच्या नावावर बांगलादेशसाठी सर्वाधिक एकदिवसीय धावा करण्याचा विक्रम आहे. तमीमने वनडे क्रिकेटमध्ये 8 हजार 313 धावा केल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us