
आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमासाठी 16 डिसेंबरला अबुधाबीत मेगा ऑक्शन होणार आहे. मात्र त्याआधी क्रिकेट चाहत्यांना आणखी एक ऑक्शन पाहायला मिळणार आहे. डब्ल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी अवघ्या काही दिवसांत मेगा ऑक्शन होणार आहे. (Photo Credit: PTI)

डब्ल्यूपीएल 2026 साठी गुरुवारी 27 नोव्हेंबरला मेगा ऑक्शन पार पडणार आहे. या मेगा ऑक्शनसाठी 277 खेळाडूंनी नाव नोंदवलं आहे. मात्र त्यापैकी फक्त 73 खेळाडूंनाच ऑक्शनद्वारे घेतलं जाणार आहे. डब्ल्यूपीएलचं हे चौथं पर्व असणार आहे. तसेच दर 3 हंगामांनंतर मेगा ऑक्शनचं आयोजन केलं जातं. (Photo Credit: PTI)

या ऑक्शनमध्ये भारताच्या सर्वाधिक 194 महिला खेळाडूंचा सहभाग असणार आहे. तर ऑक्शनसाठी ऑस्ट्रेलियाच्या 23, इंग्लंडच्या 22 न्यूझीलंडच्या 13, दक्षिण आफ्रिकेच्या 11, विंडीज 4, बांगलादेश आणि श्रीलंका प्रत्येकी 3, यूएई 2, थायलँड आणि यूएसए संघाचे प्रत्येकी 1-1 महिला खेळाडू या ऑक्शनमध्ये नशीब आजमवणार आहेत. (Photo Credit: PTI)

ऑक्शनमध्ये सर्वात आधी प्रमुख खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. या 8 खेळाडूंमध्ये दीप्ती शर्मा, एलिसा हीली, लॉरा वोल्वार्ड, मेग लॅनिंग,रेणूका सिंह, सोफी एक्लेस्टेन, एमेली किर आणि सोफी डिव्हाईन यांचा समावेश आहे. लॉरा वोल्वार्डची बेस प्राईज 30 लाख रुपये आहे. तर रेणुका सिंहची बेस प्राईज 40 लाख रुपये इतकी आहे. या व्यतिरिक्त उर्वरित 6 खेळाडूंची बेस प्राईज ही 50 लाख रुपये इतकी आहे. (Photo Credit: PTI)

मेगा ऑक्शनमधील 277 पैकी 19 खेळाडूंची बेस प्राईज ही 50 लाख रुपये इतकी आहे. तर 10 लाख रुपये ही सर्वात कमी बेस प्राईज आहे. अनकॅप खेळाडूंसाठी 10 लाख रुपये बेस प्राईज ठेवण्यात आली आहे. या मेगा ऑक्शनमध्ये 155 अनकॅप खेळाडू आहेत. तर 79 विदेशी खेळाडू आहेत. तसेच 4 खेळाडू हे असोशिएट देशांचे आहेत. (Photo Credit: PTI)