बीसीसीआयचा मोठा निर्णय! सचिन तेंडुलकरला पहिल्यांदाच मिळणार हा पुरस्कार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय लवकरच एका पुरस्काराचं आयोजन करणार आहे. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला एका खास पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शनिवारी मुंबईत बोर्डाच्या वार्षिक समारंभात प्रतिष्ठित पुरस्कार दिला जाणार आहे.

| Updated on: Jan 31, 2025 | 5:05 PM
1 / 5
बीसीसीआयचा 1 फेब्रुवारीला मुंबईत समारंभ होणार आहे. या समारंभापूर्वी बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार, या कार्यक्रमात भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला सीके नायडू पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.

2 / 5
सचिन तेंडुलकरला हा पुरस्कार लाईफटाइम अचिव्हमेंट म्हणून दिला जाणार आहे. सध्या तरी अशी शक्यता आहे. मात्र बीसीसीआयकडून अधिकृतरित्या याबाबत काहीच सांगितलेलं नाही. दरम्यान सचिन तेंडुलकरने 24 वर्षांच्या क्रिकेट कारकि‍र्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याने 16 वर्षे आणि 205 दिवसांचा असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता.

3 / 5
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आधीच भारताच्या सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यासबोत त्याला अर्जुन पुरस्कार, खेळरत्न, पद्मश्री, पद्म विभुषण आणि महाराष्ट्र भुषण पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. तर 2012 मध्ये ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा देखील पुरस्कार मिळाला आहे. इतकंच काय तर आयसीसी आणि बीसीसीआयकडूनही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

4 / 5
सचिनने भारतासाठी 1 टी200, 200 कसोटी आणि 463 एकदिवसीय सामने खेळले आहेत. म्हणजेच एकूण 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. या काळात त्याने कसोटीत विक्रमी 15921 धावा आणि एकदिवसीय सामन्यात 18426 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके ठोकण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे.

5 / 5
सचिन तेंडुलकर याच्या आधी हा पुरस्कार सुनील गावसकर, बीबी निंबाळकर, चंदू बोर्डे, बिशनसिंग बेदी, ए वेंकटराघवन, ईएस प्रसन्ना, बी.एस. चंद्रशेखर, मोहिंदर अमरनाथ, सलीम दुराणी, अजित वाडेकर, कपिल देव, दिलीप वेंगसरकर, सय्यद किरमाणी, राजिंदर गोयल, पद्माकर शिवलकर, के श्रीकात आणि फारुख इंजिनियर यांना सीके नायडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.