इंग्लंड संघातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू, राजासारखं जगणं आणि मालिकेत बजावणार महत्त्वाची भूमिका

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. असं असताना काही खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा होत आहे. आता इंग्लंडच्या एका खेळाडूच्या श्रीमंतीची जोरदार चर्चा रंगली आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर

| Updated on: Jun 18, 2025 | 5:12 PM
1 / 5
इंग्लंडचा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू कोण? अशी चर्चा रंगली आहे. मागचा इतिहास काढला तर स्टूअर्ट ब्रॉडचं नाव आघाडीवर येतं. पण सध्याच्या संघात असलेला श्रीमंत क्रिकेटपटू कोण आहे? त्याच्या नावाची सध्या चर्चा रंगली आहे.  (Photo: PTI)

2 / 5
इंग्लंडच्या कसोटी संघात सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू हा कर्णधार बेन स्टोक्स आहे. त्याची एकूण संपत्ती 105 कोटींची आहे. यात सर्वाधिक कमाई ही एंडोर्समेंट आणि आयपीएल कॉन्ट्रॅक्टमधून होते.  (Photo: PTI)

3 / 5
बेन स्टोक्सने डरहममध्ये एक राजवाड्यासारखं घर विकत घेतलं आहे. पूर्वी हे घर फुटबॉलपटू एडम जॉनसनकडे होते. पण 2016 मध्ये त्याने 19.80 कोटीला खरेदी केलं आणि चर्चेत आला. या घरात चोरीचा देखील प्रयत्न झाला होता. तेव्हा बेन स्टोक्स पाकिस्तान दौऱ्यावर होता. पण या घटनेत कुटुंबियांना कोणतीह इजा झाली नाही. (Photo: PTI)

4 / 5
बेन स्टोक्सच्या राजवाड्यासारख्या घरात 5 बेडरुम आहे. तसेच त्याचं 2.2 एकरमध्ये आहे. यात व्यायामशाळा, होम थिएटर आणि गेमिंग रुम देखील आहे.(Photo: PTI)

5 / 5
बेन स्टोक्सनंतर इंग्लंडच्या कसोटी संघातील दुसरा श्रीमंत खेळाडूचा मान जो रूटला मिळतो. त्याची एकूण संपत्ती जवळपास 84 कोटींची आहे. (Photo: PTI)