
इंग्लंडचा विस्फोटक ऑलराउंडर बेन स्टोक्स याने नेदरलँड्स विरुद्ध धुव्वादार शतकी खेळी केली. स्टोक्स इंग्लंडकडून या वर्ल्ड कपमध्ये शतक करणारा पहिला फलंदाज ठरला.

स्टोक्सने 84 बॉलमध्ये 108 धावांची शतकी खेळी केली. स्टोक्सने या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकार लगावले.

बेन स्टोक्सने 128.57 च्या स्ट्राईक रेटसह या धावा केल्या. स्टोक्सने या शतकासह अनेक विक्रम केले.

बेन स्टोक्सने नेदरलँड् विरुद्धच्या सामन्यात मोठा कीर्तीमान केला. स्टोक्सने टेस्ट, वनडे आणि टी 20 या तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून एकूण 10 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पूर्ण केला.

तसेच बेन स्टोक्स 100 पेक्षा अधिक विकेट्स आणि 10 हजार धावा करणारा इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला.