FIFA World Cup 2026: नात्याने सख्खे भाऊ, पण मैदानात उतरताच होतात वैरी! जाणून घ्या अशा जोड्यांबाबत

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेला लवकरच सुरुवात होणार आहे. असं असताना या स्पर्धेतील काही रंजक गोष्टींची चर्चा होत आहे. सख्खे भावंड मैदानात एकमेकांविरोधात उतरलेले पाहिलेत का? फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अशी चार उदाहरणं पाहायला मिळणार आहेत.

| Updated on: Jun 10, 2026 | 3:50 PM
1 / 5
फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील प्रत्येक सामन्यांचा थरार अनुभवण्यासाठी क्रीडाप्रेमी सज्ज झाले आहेत. एकाच देशासाठी दोन भावंड खेळत असल्याची अनेक उदाहरणं तुम्ही ऐकली आणि पाहिली आहेत. पण आता दोन सख्खे भाऊ परस्पर विरोधी संघात खेळताना पाहायला मिळणार आहेत. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अशी चार उदाहरणं आहेत. (Photo: Getty Images)

2 / 5
गेलाह डो आणि डेझायर डो हे दोन सख्खे भाऊ परस्पर विरोधी संघातून खेळताना दिसणार आहेत. गेलहा डो आयव्हरी कोस्टकडून मैदानात उतरणार आहे. तर त्याचा धाकटा भाऊ डेझायर हो फ्रान्सकडून खेळणार आहे. (Photo: Getty Images)

3 / 5
इनाकी विल्यम्स आणि निको विल्यम्स या दोन सख्ख्या भावांची अशीच कथा आहे. इनाकी विल्यम्स या स्पर्धेत घानकडून मैदानात उतरणार आहे. त्याचे आई वडील घानाचे आहेत. तर त्याचा धाकटा भाऊ नको विल्यम्स स्पेनकडून खेळणार आहे. त्याचा जन्मही स्पेनचा आहे. (Photo: Getty Images)

4 / 5
डेरिक लुकासेन आणि ब्रायन बोबे हे दोघं सावत्र भावंड आहेत.  या दोघांची आई एकच आहे, पण वडील वेगवेगळे आहेत. डेरिक लुकासने या स्पर्धेत घानाकडून खेळणार आहे. त्याला स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात दुखापतग्रस्त झालेल्या खेळाडूच्या जागी संघात स्थान मिळालं आहे. तर ब्रायन बोबे नेदरलँड संघात आहेत. (Photo: Getty Images)

5 / 5
हॅरी साउटर आणि जॉन साउटर या भावंडांची जोडीही चर्चे आहे. 27 वर्षीय हॅरी साउटरचा जन्म स्कॉटलँडचा आहे. पण या स्पर्धेत तो ऑस्ट्रेलियाकडून खेळणार आहे. तर त्याचा मोठाा भाऊन जॉन साउटर स्कॉटिश संघात भाग असेल. हॅरी युवा फुटबॉल स्पर्धेत स्कॉटलँडकडून खेळला आहे. पण मागच्या सात वर्षांपासून ऑस्ट्रेलियाकडून खेळत आहे. (Photo: Getty Images)

Follow Us