भारताची ‘हेड’दुखी कोणतं मलम घालवणार? फिरकी की वेगवान? कोणता इलाज जालीम ठरणार?

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात भारताला ट्रेव्हिस हेडचं संकट पार करावं लागणार आहे. कारण भारताच्या जेतेपदाच्या मार्गात हेड कायम अडसर राहिला आहे. त्यामुळे त्याला बाद करण्याचं आव्हान आहे.

| Updated on: Mar 03, 2025 | 10:28 PM
1 / 6
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. 4 मार्च रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात हा सामना होणार आहे. या सामन्यात भारतासमोर ट्रेव्हिस हेडचं मोठं आव्हान असणार आहे.

2 / 6
मागच्या दोन आयसीसी स्पर्धेत ट्रेव्हिस हेडने भारताचं विजयाचं स्वप्न धुळीस मिळवलं होतं. आयसीसी स्पर्धेत ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या शैलीत कायम बदल पाहायला मिळाला आहे. कोणत्याही परिस्थितीत हार पत्कारायची नाही असा मानस असतो. त्यामुळे टीम इंडियाला ट्रेव्हिस हेडला रोखण्याचं आव्हान आहे.

3 / 6
ट्रेव्हिस हेडने 2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप भारताचा मार्ग अडवला होता. सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या. संघाकडून ट्रॅव्हिस हेडने 174 चेंडूत  163 धावा केल्या. भारताने अखेर 163धावांनी सामना गमावला आणि जेतेपदाचं स्वप्न भंगलं.

4 / 6
2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारताने फक्त 240 धावा केल्या. ऑस्ट्रेलियानेही 47 धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. टीम इंडियाला जेतेपद जिंकण्याची आशा होती. पण ट्रॅव्हिस हेडने 120 चेंडूत 137 धावा करत ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवून दिले.

5 / 6
2024 मध्ये टी20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीत भारत ऑस्ट्रेलिया संघ समोरासमोर आले होते. तेव्हा भारताने सामना जिंकला, पण ट्रेव्हिस हेडने 43 चेंडूत नऊ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 76 धावा केल्या. पण भारताने दिलेल्या 205 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग ऑस्ट्रेलियाला करता आला नाही.

6 / 6
2024-25 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारूण पराभव झाला. याचे एक मोठे कारण म्हणजे ट्रेव्हिस हेड. पाच सामन्यांच्या मालिकेत 448 धावा करत हेड सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. अॅडलेड आणि गाबा कसोटीतही शतके झळकावली. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जर हे़ लवकर आऊट झाला नाही तर आणखी एक स्वप्न भंगू शकतं.