Mitchell Starc : 8 बॉलमध्ये 42 रन्स, अनकॅप्ड खेळाडूंकडून स्टार्कची धुलाई

PBKS vs DC, IPL 2026: मिचेल स्टार्क त्याच्या धारदार बॉलिंगसाठी ओळखला जातो. मात्र स्टार्कच्या बॉलिंगवर सोमवारी 11 मे रोजी पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी खोऱ्याने धावा केल्या.

| Updated on: May 12, 2026 | 5:09 PM
1 / 5
मिचेल स्टार्क हा क्रिकेट विश्वातील टॉप 10 मधील गोलंदाजांपैकी 1 आहे. स्टार्क सध्या आयपीएल 2026 स्पर्धेत दिल्ली कॅपिट्ल्सकडून खेळतोय. सोमवारी 11 मे रोजी पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी स्टार्कची जोरदार धुलाई केली. स्टार्कने त्याच्या कोट्यातील 4 ओव्हरमध्ये 57 धावा लुटवल्या. (Photo Credit : PTI)

2 / 5
स्टार्कची टी 20 लीग स्पर्धेत फलंदाजांकडून अशाप्रकारे धुलाई होण्याची पहिलीच वेळ ठरली. स्टार्कने टी 20I क्रिकेटमध्ये न्यूझीलंड विरुद्ध 2021 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये 60 रन्स खर्च केल्या होत्या. (Photo Credit : PTI)

3 / 5
मिचेल स्टार्क याने टाकलेल्या पहिल्याच बॉलवर प्रियांश आर्याने सिक्स खेचला. स्टार्कने त्याच्या कोट्यातील 4 ओव्हरमधील 8 बॉलमध्ये 42 रन्स खर्च केल्या. स्टार्कला पंजाबच्या फलंदाजांनी 5 षटकार आणि 3 चौकार लगावले. मुंबईकर सूर्यांश शेडगे आणि प्रियांश आर्या या दोघांनी स्टार्कला प्रत्येकी 2 सिक्स खेचले. तर कूपर कॉनोली याने 1 सिक्स लगावला. (Photo Credit : PTI)

4 / 5
स्टार्कने पंजाब विरुद्ध 2 विकेट्सही मिळवल्या. स्टार्कने या दोन्ही विकेट्स त्याच्या कोट्यातील चौथ्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये घेतल्या. स्टार्कने पहिल्या 2 चेंडूत सलग माधव तिवारी आणि शशांक सिंह या दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. (Photo Credit : PTI)

5 / 5
दरम्यान स्टार्कला या 19 व्या मोसमात आतापर्यंत काही खास करता आलेलं नाही. स्टार्कने  4 सामन्यांत 5 विकेट्स मिळवल्या आहेत. स्टार्कसाठी दिल्ली कॅपिट्ल्सने 11 कोटी 75 लाख रुपये मोजले आहेत. (Photo Credit : PTI)

Follow Us