
आयपीएल 2025 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी त्याच्या आक्रमक सेलिब्रेशनमुळे चर्चेत आला आहे. पण सनरायझर्स हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात दिग्वेश राठीने सर्वच सीमा ओलांडल्या. याची दखल बीसीसीआयने घेतली असून त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. (फोटो- आयपीएल/बीसीसीआय)

दिग्वेश राठीवर एका सामन्याच्या बंदीसह सामना शुल्काच्या 50 टक्के दंडही ठोठावण्यात आला आहे. इतकंच काय तर त्याच्या खात्यात 5 डिमेरिट पॉइंट्स जमा झाले आहेत. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याला वगळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (फोटो- आयपीएल/बीसीसीआय)

दिग्वेशने अभिषेक शर्माची विकेट घेतल्यावर त्याच्या परिचित शैलीत नोटबुक सेलिब्रेशन केले. तसेच अभिषेक शर्माला मैदान सोडण्याचा इशाराही केला. यावर अभिषेक शर्माला राग आला आणि दोघांमध्ये भांडण झाले. दोघांनाही जवळ येत असल्याचे पाहून पंचांनी हस्तक्षेप केला आणि परिस्थिती शांत केली.(फोटो- आयपीएल/बीसीसीआय)

दिग्वेश राठीने भांडण केल्याने एका सामन्याची बंदी घालण्यात आली. तर अभिषेक शर्माच्या पहिल्या चुकीबद्दल त्याच्या मॅच फीत फक्त 25 टक्के कपात करण्यात आली. (फोटो- आयपीएल/बीसीसीआय)

आयपीएलच्या सुरुवातीला पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात दिग्वेश राठीने प्रियांश आर्यला बाद केल्यानंतर नोटबुक सेलिब्रेशनसह फलंदाजाला टोमणे मारले होते. या अनुचित वर्तनासाठी दिग्वेशला त्याच्या सामना शुल्काच्या 25% दंड ठोठावण्यात आला. तसेच एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला.पंजाब किंग्सविरुद्धच्या प्रकरणात दिग्वेश राठी पहिल्यांदा लेव्हल 1 अंतर्गत दोषी आढळला. (फोटो- आयपीएल/बीसीसीआय)

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात नमन धीरला क्लीन बॉल्ड केल्यानंतर दिग्वेशने एक नोटबुक सेलिब्रेशन केले. या भयानक सेलिब्रेशनसाठी राठीला त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड आणि 2 डिमेरिट पॉइंट्स देण्यात आले. 4 एप्रिल 2025 रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध दुसऱ्यांदा लेव्हल 1 अंतर्गत दोषी आढळला होता. (फोटो- आयपीएल/बीसीसीआय)