
ऋषभ पंत याने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून उपकर्णधार म्हणून पदार्पण केलं. पंतने या सामन्यात 134 धावांची खेळी केली. पंतने त्यानंतर विकेटमागून आणखी एक खास कारनामा केला आहे. पंतने विकेटकीपर म्हणून ओली पोप याचा कॅच घेतला आणि मानाच्या यादीत स्थान मिळवलं आहे. पंतच्या पुढे आता माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि दिग्गज सय्यद किरमानी आहेत. पंतने 44 व्या कसोटी सामन्यात हा कारनामा केला आहे. (Photo-Visionhaus/Getty Images)

ऋषभ पंत 44 कसोटी सामन्यांत 150 कॅच घेणारा तिसरा भारतीय विकेटकीपर ठरला आहे. पंतने 150 कॅच व्यतिरिक्त 15 फलंदाजांना स्टंपिंग आऊट केलं आहे. धोनी आणि किरमानी यांनीही विकेटकीपर म्हणून 150 कॅच घेतल्या आहेत. या दोघांनीही पंतच्या तुलनेत अधिक कसोटी सामने खेळले आहेत. (Photo-Visionhaus/Getty Images)

ऋषभ पंत याने इंग्लंड विरूद्धच्या या पहिल्या कसोटीत 178 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 12 फोरसह 75.28 च्या स्ट्राईक रेटने 134 रन्स केल्या. पंतने यासह कसोटीत 3 हजार धावाही पूर्ण केल्या. पंतच्या कसोटी कारकीर्दीतील हे सातवं शतक ठरलं. पंतने यासह धोनीला शतकांबाबत मागे टाकलं. (Photo-PTI)

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्रसिंह धोनी याने 90 कसोटी सामने खेळले आहेत. धोनीने या दरम्यान 256 कॅचेस घेतल्या आहेत. तसेच धोनीने 38 फलंदाजांना स्टंपिंग केलं. धोनीने कसोटीत 38.09 च्या सरासरीने 6 शतकं आणि 33 अर्धशतकांच्या मदतीने 4 हजार 876 धावा केल्या आहेत. (Photo-Chris Hyde/Getty Images)

टीम इंडियाचे दिग्गज आणि माजी विकेटकीपर बॅट्समन सय्यद किरमानी यांनी 88 कसोटी सामन्यांमध्ये 160 कॅच घेण्यासह 38 फलंदाजांना स्टंपिंग केलं आहे. किरमानी यांनी कसोटीत 2 शतकांसह 2 हजार 759 धावा केल्या आहेत. (Photo-Adrian Murrell/Allsport/Getty Images/Hulton Archive)