FIFA World Cup 2026: अमेरिकेने पहिल्याच सामन्यात रचला इतिहास, इतक्या गोलसह नोंदवला विजयी विक्रम
USA vs Paraguay: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अमेरिका आणि पॅराग्वे हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात अमेरिकेने चार गोल मारले. पण पहिला गोल त्यांना पॅराग्वेच्या खेळाडूमुळे मिळाला. त्यामुळे सामन्यात 1-0 ने आघाडी मिळाली होती.

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडाकडे आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अमेरिकाचा सामना पॅराग्वेशी झाला. या सामन्यात अमेरिकेने पॅराग्वेला 4-1 ने मात दिली आणि पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली. (Photo: Getty Images)

अमेरिकाच संघ ड गटात असून या ग्रुपमध्ये तुर्की, ऑस्ट्रेलिया आणि पॅराग्वे संघ आहेत. त्यामुळे या गटातून पुढच्या फेरीत कोणाला तिकीट मिळणार याची उत्सुकता आहे. अमेरिकेचा पहिलाच सामना असल्याने प्रेक्षकांनी मैदानात खचखच भरलं होतं. इतकंच काय तर हॉलिवूड स्टार टॉम क्रूजने या सामन्याला उपस्थिती लावली होती. (Photo: Getty Images)

अमेरिकन संघाने आपल्या पहिल्या सामन्यात चाहते आणि स्टार सेलिब्रेटीला नाराज केलं नाही. पॅराग्वेविरुद्ध 4 गोल मारत इतिहास रचला. फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात अमेरिकेने पहिल्यांदाच चार गोल मारण्याचा विक्रम रचला आहे. (Photo: Getty Images)

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्या सामन्यात अमेरिकेला पहिला गोल फुकटचा मिळाला. कारण पॅराग्वेचा फुटबॉलपटू डेमियन बोबाडिला याच्या चुकीने अमेरिकेला फायदा झाला. त्याने सामन्याच्या सातव्या मिनिटाला आपल्याच गोल पोस्टमध्ये गोल मारला. (Photo: Getty Images)

त्यानंतर अमेरिकन फुटबॉलपटूंनी आघाडी मिळाल्यानंतर आक्रमक चढाई केली. फोलॅरिन बॅलोगनने अमेरिकेसाठी पहिला गोल मारला. 31 व्या मिनिटाला त्याने गोल मारला. त्यानंतर पहिल्या हाफच्या इंजरी टाइममध्ये (45+5 मिनिटे) यात दोन गोल मारले. पॅराग्वे तीन गोलने मागे होती. पण मॉरिसियोने 73व्या मिनिटाला गोल मारला. पण सामन्यात काही येता आलं नाही. शेवटच्या मिनिटाला अमेरिकेकडून जियोवानी रेनाने चौथा गोल मारला. (Photo: Getty Images)