
कॅनडामध्ये ग्लोबल टी-२० लीगचे आयोजन करण्यात आले होते. या लीगमध्ये जगातील स्टार खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना सरे जग्वार्स विरुद्ध मॉन्ट्रियल टायगर्स यांच्यात झाला. या सामन्यात मॉन्ट्रियल टायगर्सने विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू शेरफेन रदरफोर्ड याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. यात त्याला पैसे, दुचाकी किंवा कार मिळाली नाही तर जमीन दिली गेली.

शेरफान रदरफोर्ड याला मालिकावीर म्हणून अमेरिकेत अर्धा एकर जमीन देण्यात आली आहे. रदरफोर्ड याला मिळालेल्या या पुरस्काराची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

अंतिम सामन्यात शेरफान रदरफोर्ड याने 29 चेंडूत नाबाद 38 धावा केल्या. या सामन्यात त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सरे जग्वार संघाने 5 गडी गमावून 130 धावा केल्या. सरेकडून जतींद्र सिंगने 57 चेंडूत 56 धावा केल्या. विजयी धावांचा पाठलाग करताना मॉन्ट्रियल टायगर्सने 5 गडी गमावून विजय मिळवला. आंद्रे रसेलने 6 चेंडूत 20 धावांची तुफानी खेळी केली. या डावात 2 षटकार आणि 1 चौकार मारला.