स्टार फुटबॉलपटू मेस्सीच्या प्रायव्हेट जेटची ‘हवा’, Gulfstream V ची किंमत किती माहितीय?

Lionel Messi, Gulfstream V Private Jet : अर्जेंटिनाचा वर्ल्ड कप विनर स्टार फुटबॉलपटू 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे. मेस्सीचा आजचा भारत दौऱ्यातील दुसरा दिवस आहे. मेस्सी मुंबई दौऱ्यावर आहे. मेस्सीच्या या भारत दौऱ्यादरम्यान त्याच्या प्रायव्हेट जेटने चाहत्यांचं लक्ष वेधलं. जाणून घ्या मेस्सीच्या प्रायव्हेट जेटबाबत.

| Updated on: Dec 14, 2025 | 5:03 PM
1 / 5
भारत दौऱ्यावर असलेल्या दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याच्या  Gulfstream व्ही प्रायव्हेट जेटची चर्चा पाहायला मिळतेय. मेस्सीकडे असलेल्या या प्रायव्हेट जेटची किंमत ही भारतीय रुपयांत तब्बल 136 कोटी इतकी आहे. एव्हीएशन रिपोर्ट्सनुसार, मेस्सीने प्रवास केलेल्या या Gulfstream व्ही या जेटची किंमत 9 ते 14 मिलियन डॉलर इतकी आहे. तसेच या जेटचा वार्षिक खर्च हा 2 ते 4 मिलियन डॉलर इतका आहे. यात इंधन, क्रू मेंबर आणि मेंटेनन्सचा समावेश आहे.

2 / 5
Gulfstream V हा बिजनेस जेट आहे.या जेटची अफाट अशी क्षमता आहे. हा जेट न थांबता 12038 किमी प्रवास करु शकतो. या जेटची टॉप स्पीड ही 1084.16 km/h इतकी आहे. तसेच हा जेट 51 हजार फूट उंच झेपावू शकतो. (Photo Credit : Globaljet)

3 / 5
या प्रायव्हेट जेटमध्ये 14 लेदर सीट आहेत. या 14 लेदर सीट 7 फ्लॅट बेडमध्ये बदलता येतात. त्यामुळे प्रवासात सहज झोपताही येतं.  तसेच या जेटमध्ये लाउंज एरिया, प्रायव्हेट स्लीपिंग स्पेस आणि काम करण्यासाठी खासगी रुमचा समावेश आहे. तसंच किचन , टॉयलेट आणि मनोरंजनाचीही सोय या जेटमध्ये करण्यात आली आहे.(Photo Credit : Globaljet)

4 / 5
लियोनेल मेस्सी याचे जगभरात चाहते आहेत. मेस्सीसोबत सेल्फी घेण्याचा चाहत्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टार खेळाडूसाठी प्रायव्हसी, सुरक्षा या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे हे जेट मेस्सीसाठी अनेक अर्थाने फायदेशीर ठरतंय. (Photo Credit :  IG/Lionel Messi)

5 / 5
दरम्यान लियोनेल मेस्सी शनिवारी कोलकाता दौऱ्यावर होता. मेस्सीचं कोलकातात दणक्यात स्वागत करण्यात आलं. मेस्सीला पाहण्यासाठी चाहत्यांनी काल विमानतळावर तोबा गर्दी केली होती. त्यामुळे मेस्सीला विमानतळाच्या मागील गेटवरुन हॉटेलमध्ये नेण्यात आलं.  त्यामुळे मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी तासनतास प्रतिक्षेत असलेल्या चाहत्यांचा हिरमोड झाला. (Photo Credit :  CBS Sports Golazo)