मनोज जरांगेंकडून जाहीर प्रस्ताव आला, वेळ देण्यास तयार पण…फडणवीसांपुढे ठेवली महत्त्वाची अट; मुंबईत जाणार की नाही?
मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे. आपण काहीही झाले तरी मुंबईला १८ तारखेला पोहचणारच असा इशारा त्यांनी दिला आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने कुच केले आहे. त्यांनी उद्या दुपारी एक वाजता मुंबईच्या दिशेने कूच करणार असे त्यांनी म्हटले आहे. आणि काहीही झाले तरी १८ तारखेला मुंबईत पोहचणार असे त्यांनी म्हटल्याने सरकारला टेन्शन आले आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी पाटोद्यात रात्री उशीरा एक महत्वाचे विधान केले आहे. त्यांनी सरकारला जाहीर प्रस्ताव दिला आहे. त्यांनी फडणवीसांसमोर एक अटच घातली आहे.
मनोज जरांगे यांनी मुंबईला येणारच असे म्हटले आहे. मात्र, त्यांनी रात्री उशीरा पाटोद्यात एक वक्तव्य केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्याकडे प्रस्ताव दिला तर तुम्ही आंदोलन मागे घेणार का ? असा सवाल त्यांना पत्रकारांनी केला असता त्यांनी सरकारला वेळ कशाला हवा आहे. त्यांना जर वेळ हवा असला तर त्यांचा वेळ कशासाठी हवे हे आम्ही पाहून त्यांना वेळ द्यायचा की नाही हे ठरवू असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. जर देवेंद्र फडणवीस यांना काही प्रस्ताव द्यायचा असेल तर त्यांनी मराठा समाजासमोर यावे असेही जरांगे यांनी म्हटले आहे.
फडणवीसांनी लेखी टाईम बॉण्ड करुन द्यावा
सरकारला वेळ कशाला हवा. टाईम कशाला पाहिजे ? आम्हाला पटले तर सरकारला वेळ देऊ ना. पण फडणवीसांनी स्वत: मराठ्यांसमोर यावे. त्यांनी अमूक इतक्या दिवसात मागण्या पूर्ण करु हे बॉण्डवर लिहून दिले पाहिजे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ५८ लाखांना नोंदींना धक्का लागणार नाही याची हमी फडणवीस यांनी लेखी द्यावी. हैदराबाद गॅझेटियर नुसार नोंदी लागू करणार असे सांगावे, चार प्रमाण पत्रे मिळावीत आहे. सातारा गॅझेटियर लागू करावे अशा मागण्या मनोज जरांगे यांनी केल्या आहेत.
