
ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेलने वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध 128 बॉलमध्ये नाबाद 201 धावांची द्विशतकी खेळी केली. ग्लेनने या खेळीत 21 चौकार आणि 10 सिक्स ठोकले. ग्लेनने या द्विशतकासह 5 रेकॉर्ड्स केले. ग्लेनने नक्की काय काय केलंय ते पाहुयात.

ग्लेन मॅक्सवेल वनडेत द्विशतक करणारा ऑस्ट्रेलियाचा पहिला आणि एकूण नववा फलंदाज ठरला.

ग्लेन मार्टिन गुप्टील आणि ख्रिस गेल यांच्यानंतर वर्ल्ड कपमध्ये शतक करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.

ग्लेन मॅक्सवेलने वर्ल्ड कपमध्ये चेसिंग करताना द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज होण्याचा बहुमान मिळवला आहे.

ग्लेनने वर्ल्ड कपमध्ये चेसिंग करताना सर्वाधिक धावा करण्याचा 12 वर्षांआधीचा विश्व विक्रमही मोडीत काढला आहे. ग्लेनने याबाबतीत इंग्लंडचा माजी फलंदाज एंड्रयू स्ट्रॉस याला मागे टाकलं. स्ट्रॉसने 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया विरुद्ध 158 धावा केल्या होत्या.

ग्लेनने ऑस्ट्रेलियाकडून वर्ल्ड कपमधील एका सामन्यात सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड ब्रेक केला. ग्लेनने डेव्हिड वॉर्नर याच्या 178 धावांचा विक्रम मोडीत काढला. वॉर्नरने अफगाणिस्तान विरुद्धच 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये ही खेळी केली होती.