
आयसीसी अंडर 19 वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या गोंगाडी त्रिशाने इतिहास रचला आहे. गोंगडीने 59 चेंडूत शतक खेळी केली. यावेळी तिने स्कॉटलंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. तिच्या शतकी खेळीमुळे टीम इंडियाला 200 पार धावा करता आल्या. गोंगडी या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे.

गोंगाडी त्रिशा आणि जी कमालिनी यांनी पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. गोंगडी त्रिशाने 59 चेंडूत नाबाद 110 धावांची खेळी केली. यावेळी तिचा स्ट्राईक रेट हा 186.44 चा होता. यावेळी तिने 13 चौकार आणि 4 षटकार मारले.

गोंगडी त्रिशाने आयसीसी अंडर 19 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नाबाद 110 खेळीसह 230 धावा केल्या आहे. यासह या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे.

गोंगाडी त्रिशा आयसीसी अंडर 19 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत शतक ठोकणारी पहिली फलंदाज ठरली आहे. या स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी खेळी आहे.

या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गोंगाडीने फक्त 4 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या सामन्यात जबरदस्त कमबॅक केलं. मलेशियाविरुद्ध नाबाद 27, श्रीलंकेविरुद्ध 49, बांगलादेशविरुद्ध 40 धावा केल्या होत्या.