Harmanpreet Kaur: सचिन-विराटला जे जमलं नाही ते हरमनप्रीत कौरने करून दाखवलं, लॉर्ड्सवर रचला इतिहास
India vs England Women Test Lord's: भारत आणि इंग्लंड वुमन्स संघात कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने इतिहास रचला आहे. तिने 121 चेंडूत 58 धावा केल्या आणि एका विक्रमाची नोंद केली आहे.

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार हरमनप्रीत कौरने इतिहास रचला. हरमनप्रीत कौरने या सामन्यात 121 चेंडू खेळले आणि 58 धावा केल्या. या खेळीसह तिने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photos Credit: Getty Images)

हरमनप्रीत कौरने लॉर्ड्सवर अर्धशतकी खेळी करताच क्रिकेट कारकिर्दीत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. अशी कामगिरी सचिन विराटसारख्या दिग्गज खेळाडूंना करता आली नाही. हरमनप्रीत कौर लॉर्ड्स मैदानात तिन्ही फॉर्मेटमध्ये अर्धशतक ठोकणारी पहिली भारतीय, पहिली महिला आणि जगातील चौथी खेळाडू ठरली आहे. (Photos Credit: Getty Images)

हरमनप्रीत कौरने लॉर्ड्स मैदानात कसोटी, वनडे आणि टी20 सामन्यात अर्धशतक ठोकलं आहे. यापूर्वी यूनिस खान, महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांना ही कामगिरी करता आली होती. आता या पंगतीत हरमनप्रीत कौर बसली आहे. (Photos Credit: Getty Images)

हरमनप्रीत कौरने या मैदानात वनडेत 2 अर्धशतक ठोकली आहे. 2012 आणि 2017 मध्ये ही कामगिरी केली आहे. महिला टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक ठोकलं होतं. आता कसोटीत इंग्लंडविरुद्ध अर्धशतकी खेली केली. (Photos Credit: Getty Images)

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात हरमनप्रीत कौरने स्मृती मंधानासह अर्धशतकी भागीदारी केली. दोघांनी 155 चेंडूत 89 धावांची भागीदारी केली. मंधानाने 83 धावा केल्या, 17 धावांनी तिचं शतक हुकलं. (Photos Credit: Getty Images)